Monday, July 1, 2024

अक्षयने ‘OMG 2’साठी घेतलेल्या मानधनाविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘त्याने एक रुपड्याही…’

अक्षय कुमार याची गणना सुपरस्टार्समध्ये होते. त्याच्या अभिनयासोबतच त्याने सिनेमासाठी आकारलेल्या मानधनामुळेही तो चर्चेत असतो. अशात त्याचा ‘ओएमजी 2‘ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला रिलीज होऊन आता एक आठवडा लोटला आहे. सनी देओल याच्या ‘गदर 2’शी तुलना केली नाही, तर सिनेमाने चांगली कमाई केली आहे. अशात काही वृत्त समोर आले होते की, हा सिनेमा 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. तसेच, असेही म्हटले जात होते की, अक्षयने या सिनेमासाठी 50 कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, आता या सर्व अफवांना पूर्ण विराम लावत व्हायकॉम मोशन पिक्चरचे सीईओ अजित अंधारे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, या सिनेमासाठी अक्षय कुमारने एकही रुपया घेतला नाही. तसेच, बजेटविषयीही हैराण करणारे भाष्य केले.

अक्षय कुमारने घेतली मोठी जोखीम
‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. एकीकडे अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यावर मागील काही काळापासून सतत फ्लॉप सिनेमे देण्याचा टॅग लागला होता. तसेच, हा सिनेमाही त्याच्यासाठी मोठी जोखीम होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर हिट ठरला. त्यानंतर आता अक्षयच्या मानधनाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. अशात व्हायकॉम मोशन पिक्चरचे सीईओ अजित अंधारे (Viacom Motion Picture CEO Ajit Andhare) यांनी या प्रश्नांची उत्तर देत अफवांना पूर्णविराम लावला आहे.

अजित यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “अक्षय कुमारने या सिनेमासाठी एक रुपड्याही घेतला नाहीये. त्यांनी आमच्यासोबत आर्थिक आणि क्रिएटिव्ह जोखीमही उचलली.” तसेच, सिनेमाच्या बजेटविषयी बोलताना अजित म्हणाले की, “सिनेमाच्या बजेटबाबत वाढ करून सांगितले गेले. मी आणि अक्षय खूप काळापासून एकमेकांना ओळखतो. स्पेशल 26, टॉयलेट एक प्रेमकथा आणि ओएमजीच्या पहिल्या भागापासून आमचे चांगले संबंध आहेत.”

अक्षयशिवाय बनू शकत नव्हता सिनेमा
पुढे बोलताना अजित असेही म्हणाले की, “अक्षयशिवाय ‘ओएमजी 2’ सिनेमा बनू शकत नव्हता. कोणा एकासाठी असा सिनेमा बनवणे शक्य नव्हते. अक्षयने यासाठी आपले सर्वकाही दिले आहे.”

सिनेमाचे बजेट किती होते?
माध्यमांतील वृत्तांनुसार, अक्षय कुमारने या सिनेमासाठी 50 ते 60 कोटी रुपये घेतले आहेत. तसेच, या सिनेमाने आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली आहे. या हिशोबाने सिनेमा हिट असल्याचे बोलले जात आहे. तसेच, व्हायकॉम मोशन पिक्चरच्या सीईओंनीही सांगितले की, सिनेमाचे बजेट 150 कोटी इतपत नव्हते.

अशाप्रकारे निर्मात्यांनी अक्षय कुमारचे मानधन आणि सिनेमाच्या बजेटविषयीच्या सर्व अफवांना पूर्णविराम लावला आहे. (shocking omg 2 akshay kumar did not charge a rupee fees for the film viacom coo ajit andhare reveals)

महत्त्वाच्या बातम्या-
ऋतिकसोबतच्या पदार्पणातील सिनेमाने जिंकलेले 92 अवॉर्ड, ‘Gadar 2’ला यश मिळताच म्हणाली, ‘त्याच्यासोबत पुन्हा…’
‘करण आणि शाहरुखच्या सिनेमांमुळे भारतीय संस्कृतीचे नुकसान…’, ‘काश्मिर फाईल्स’ दिग्दर्शकाचे खळबळजनक भाष्य

हे देखील वाचा