Thursday, September 28, 2023

ऋतिकसोबतच्या पदार्पणातील सिनेमाने जिंकलेले 92 अवॉर्ड, ‘Gadar 2’ला यश मिळताच म्हणाली, ‘त्याच्यासोबत पुन्हा…’

गदर 2‘ सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होऊन आता एक आठवडा लोटला आहे. तरीही, सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या सिनेमाला चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी डोक्यावर घेतले असून सर्वजण कौतुक करत आहेत. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या जोडीलाही चाहत्यांनी प्रेम दिले आहे. अशात अमीषा पटेल ऋतिक रोशन याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. तिने ऋतिकसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चला तर, ती काय म्हणालीय जाणून घेऊयात…

सिनेमाला मिळालेल्या यशासाठी चाहत्यांना दिला धन्यवाद
सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) अभिनित ‘गदर 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सलमान खान आणि कार्तिक आर्यन यांसारखे कलाकारही सिनेमाबद्दल कौतुकाचे पूल बांधताना दिसत आहेत. अशात अलीकडेच, एका मुलाखतीत अमीषाने प्रेक्षकांचे आभार मानले आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘गदर 2’मध्ये काम केल्यामुळे अभिनेत्री खुश
अभिनेत्रीने प्रेक्षकांना धन्यवाद देत म्हटले की, “मी माझ्या चाहत्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते. तिकीट घेण्यासाठी लांब लाईनमध्ये उभे राहणे, अनेकदा जाणे आणि आमचे सिनेमे पाहणे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नसेल. कोणत्याही सिनेमाला हिट करण्यासाठी प्रेक्षकांचे महत्त्वाचे योगदान असते. मात्र, प्रेक्षकांनंतर मी देवाला धन्यवाद देईल.”

ऋतिक रोशनसोबत काम करण्याची इच्छा केली व्यक्त
मुलाखतीत पुढे बोलताना अमीषाने ऋतिकसोबत काम करण्याबाबत आपली इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली की, “जर त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली, तर मला चांगले वाटेल. प्रेक्षकांनी आमच्या केमिस्ट्रीला चांगली पसंती दर्शवली होती.” अभिनेत्रीने म्हटले की, त्याच्यासोबतचा पहिला सिनेमा एक रोमँटिक थ्रिलर होता. तिने सांगितले की, तिची इच्छा आहे तिचा पुढील सिनेमा, “एक प्रेमळ, मजेशीर प्रेम कहाणी असावी. यामध्ये थोडी कॉमेडी, शानदार संगीत आणि खूप जास्त डान्स असावा. कारण, आम्ही दोघेही चांगले डान्सर आहोत.’

ऋतिकसोबत पहिला सिनेमा
अमीषा पटेल हिने ऋतिकसोबत 2000 मध्ये रिलीज झालेल्या ‘कहो ना प्यार है’ या सिनेमात काम केले होते. या सिनेमातून या दोन्ही कलाकारांनी अभिनयात पदार्पण केले होते. या सिनेमाने तब्बल 92 पुरस्कार जिंकले होते. त्यामुळे सिनेमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली होती. (latest movie gadar 2 star ameesha patel expressed her desire to work with hrithik roshan read here)

महत्त्वाच्या बातम्या-
‘करण आणि शाहरुखच्या सिनेमांमुळे भारतीय संस्कृतीचे नुकसान…’, ‘काश्मिर फाईल्स’ दिग्दर्शकाचे खळबळजनक भाष्य
‘मी काय तुम्हाला हट्ट केला नाही…’, राहुल गांधींचा बायोपिक बघण्याविषयी सुबोध भावेचे लक्षवेधी विधान

हे देखील वाचा