‘सत्यनारायण की कथा’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंत आहे श्रद्धा कपूर; कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करण्यास दिला होकार?


कोरोनामुळे जरी सिनेमे प्रदर्शित होत नसले, तरीही नवीन चित्रपटाच्या घोषणांचा धडाका चालूच आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांचे, दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचे सिनेमे आपल्याला आगामी काळात पाहायला मिळणार आहे. कोरोनामुळे सिनेसृष्टीचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काळात हे नुकसान भरून काढण्यासाठी नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून सिनेमे प्रदर्शित झाले पाहिजे, हे लक्ष्य समोर ठेऊन इंडस्ट्री कामाला लागली आहे.

मागच्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आला आहे. नकारात्मक बातम्यांमुळे कार्तिक आर्यन इंडस्ट्रीमध्ये चांगलाच गाजत आहे. अनेक सिनेमांमधून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे बातम्यांमध्ये सांगितले जात आहे. मात्र, अशातच कार्तिक आणि त्याच्या फॅन्ससाठी एक सकारात्मक बातमी बऱ्याच दिवसांनी आली आहे, आणि ती म्हणजे कार्तिकनं त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘सत्यनारायण की कथा’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. त्याच्या या घोषणेमुळे कार्तिक पुन्हा बातम्यांमध्ये आला आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित या सिनेमासाठी काही दिवसांपासून अभिनेत्रीचा शोध सुरु होता. मात्र, आता हा शोध पूर्ण झाला असल्याचे समजत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्री श्रद्धा कपूरला या सिनेमासाठी निवडण्यात आले आहे. श्रद्धाला सिनेमाची स्क्रिप्ट आवडली असून, तिने चित्रपटासाठी होकार देखील दिला आहे. मात्र, याची अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीये. जर श्रद्धा या सिनेमात असेल, तर कार्तिक आणि श्रद्धाचा हा पहिला सिनेमा असेल.

माध्यमातील वृत्तानुसार, श्रद्धाच या भूमिकेसाठी योग्य असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. त्यामुळे श्रद्धाच सिनेमाची पहिली पसंती होती. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक नवीन फ्रेश जोडी पडद्यावर पाहता येणार आहे.

कार्तिकने नुकताच या सिनेमाचा टिझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. सोबतच त्याने लिहिले, माझ्या हृदयाच्या जवळची कहाणी ‘सत्यनारायण की कथा’. खास लोकांसह खास सिनेमा.” टिझरनुसार हा सिनेमा २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मराठमोळा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता समीर विद्वांस करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्रीने घातला विचित्र ड्रेस; नेटकरी म्हणाले, ‘आज समजले आपल्या देशात…’

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.