Tuesday, May 28, 2024

बॉलिवूडमध्ये श्रद्धा वालक हत्याकांड प्रकरणावर चित्रपट… नावाचीही केली घोषणा

दिल्लीमधील नुकत्याच घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने पूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. आफताब नावाच्या आरोप्याने खूप भयानक प्रकारे श्रद्धाचा खून करुन तिच्या शरिराचे टुकडे केले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या जोडप्याच्या प्रकणामुळे आता देशभरात भितीचे वातावरण पसरले आहे.

श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) आणि तिचा बॉयफ्रेंड अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद पेटला आणि त्याचा राग एवढा वाढला की, त्याने चक्क श्रद्धाचा खून करुन तिच्या शरिराचे तब्बल 35 टुकडे करुन जंगलामध्ये फेकूण दिले. हे तुकडे वेगवेगळ्या ठिकणी फेकूण दिले, अशी माहिती  पोलिस अधिकाऱ्याच्या तपासानुसार समोर आली. यानंतर आफताब आणि श्रद्धाच्या खुनाबद्दल रोज काहीतरी नवीन खुलासे होत आहेत. आफताबच्या अशा वगाणुकीमुळे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal) इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नकतंच घडलेल्या घटनेवर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. इंडियन हेराल्डयांच्या माहितीनुसार निर्माता आणि दिग्दर्शक मनीष एफ सिंग (Manish F Singh) यांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा करत सांगितले आहे की, ‘लिव्ह-इन बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawalla) याने श्रद्धा वालकरच्या हत्याकांडवर आधारित असेल. चित्रपटाच्या कथेवर काम देखिल सुरु झाले आहे.’

shraddha hatyakand

मनीष यांनी चित्रपटाची माहिती देत सांगितले की, ‘हा चित्रपट लव्ह लाइफ, मुलिंना फसवणूक करुन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागचे कारस्थानाची खरी माहिती समोर आनणार आहे.’ मनीषने सांगितले की, मी स्क्रीप्टवर काम सुरु केले आहे. हत्याकांडावर निर्मित होणाऱ्या चित्रपटाचे वर्किंग टायटल ‘हू किल्ड श्रद्धा वालकर’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी लोकेशन देखिल शोधले जात आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यांतरच चित्रपटाची पटकथा निश्नित केली जाइल.’

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘रामायण’ मधील रामाशी हाेताे तबस्सुम यांचे खास नाते, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से
ज्येष्ठ गायिका आशा भाेसले यांचं भारती सिंगबद्दल माेठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘माझ्यावर विश्वास ठेवा’

हे देखील वाचा