Monday, April 15, 2024

लेकीने चित्रपटसृष्टीत येऊ नये अशी होती श्रीदेवींची इच्छा, पुढे जान्हवी कपूरने केली ‘ही’ आयडिया

बॉलिवूड अभिनेत्री आणि आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने अगदी कमी कालावधीत तिचे बॉलिवूडमध्ये नाव केले आहे. आई एक सुपरस्टार असूनही तिने तिच्या मेहनतीने तिचे नाव कमावले आहे. अनेक अभिनेत्रींना मागे सारून ती बॉलिवूडमध्ये तिचे नाव कमावत आहे. तिचा सध्या लूक असो किंवा बोल्ड लूक चाहते तिच्या प्रत्येक लूकला पसंती दर्शवतात. चाहत्यांकडून तिला नेहमीच प्रेम मिळत असते. 

जान्हवी कपूरचा जन्म 6 मार्च 1997 मध्ये मुंबई येथे झाला. जान्हवी ही बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आहे. श्रीदेवी सर्वात सुंदर अभिनेत्री असण्यासोबत त्यावेळी पहिली महिला सुपरस्टार देखील होत्या. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यांचे हे चित्रपट पाहूनच जान्हवी कपूर मोठी झाली. त्यामुळे लहान असताना आपणही आपल्या आईप्रमाणे सुपरस्टार व्हावे असे जान्हवी का वाटत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी कधीही त्यांच्या मुलीच्या या स्वप्नाला अडथळा निर्माण केला नाही. परंतु श्रीदेवी यांना असे वाटत होते की, जान्हवीने चित्रपटसृष्टीत येऊ नये. त्यांना असे वाटत होते की, तिने अभ्यासावर लक्ष द्यावे. त्यांना असे वाटत होते की, तिने डॉक्टर बनावे.

जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तिच्या आईचे निधन झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच श्रीदेवी यांची निधन झाले होते. आईच्या निधनानंतर जान्हवी खूप मनातून खूप तुटली होती. परंतु आज ती बॉलिवूडमध्ये नाव कमावत आहे. अनेक चित्रपट आणि आयटम साँगमध्ये काम करून ती नावारूपाला येत आहे.

जान्हवीने ‘मिली’, ‘तख्त’, ‘अंग्रेजी मिडीयम’, ‘होस्ट स्टोरी’, ‘रुही’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती ‘दोस्ताना २’ या आगामी चित्रपटात देखील दिसणार आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकचे दर्शन ती नेहमीच तिच्या चाहत्यांना देत असते.(shridevi never wants to janhavi doing acting in bollywood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमारने लेहेंगा परिधान करुन दिला लाईव्ह परफॉर्मन्स; युजर्स म्हणाले, ‘हे बघायचे बाकी…’
आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा