Wednesday, June 26, 2024

आई श्रीदेवीने लेक जान्हवीच्या पहिला सिनेमा रिलीझ घेण्यापूर्वीच घेतली एक्झिट, ‘असे’ भंगले होते अभिनेत्रीचे स्वप्न

अभिनेत्री जान्हवी कपूर हिला बालपणापासूनच चित्रपटाची पार्श्वभूमी लाभली. श्रीदेवी यांच्या सारखी दिग्गज अभिनेत्री आई, बोनी कपूर यांच्यासारखे बॉलिवूडमधील मोठे निर्माते वडील एवढ्या मोठ्या घरात तिचा जन्म झाला. ‘धडक’ या सिनेमातून 2018 साली जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 13 ऑगस्ट हा जान्हवीची आई श्रीदेवीचा जन्मदिवस असतो. या निमित्ताने आपण जान्हवीचे स्वप्न कसे भंगले याबाबत जाणून घेऊयात…

लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन याच वातावरणात जान्हवी मोठी झाली. त्यामुळे तिने हेच क्षेत्र करियरसाठी निवडले नसते तरच आश्चर्य. जान्हवी अभिनयतच करियर करणार हे तर नक्की होते. मात्र माध्यमांमध्ये चर्चा होती की, जान्हवी कोणत्या सिनेमातून एन्ट्री घेणार? त्याच दरम्यान मराठीमध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘सैराट’ची लोकप्रियता आणि कथा पाहून अनेक दिग्दर्शकांना हा सिनेमा विविध भाषेमध्ये बनवण्याचा मोह झाला. त्यातच करण जोहरने देखील हा सिनेमा हिंदीमध्ये करण्याचा ठरवले. याच सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीची वर्णी लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

जान्हवी आणि तिचा संपूर्ण परिवार तिचा या पदार्पणासाठी खूप आनंदित होते. पहिलाच सिनेमा आणि करण जोहर सारखा निर्माता, शशांक खेतान सारखा दिग्दर्शक असल्याने सर्व सुरळीत होते, मात्र अशातच सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही महिने आधी श्रीदेवी यांचे अकाली निधन झाले. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता तर 20 जुलै 2018 रोजी ‘धडक’ (Dhadak) चित्रपट रिलीझ झाला होता. आपल्या मुलीला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. श्रीदेवीजी यांच्या अचानक असे निघून जाण्यामुळे त्यांच्या परिवारासोबतच फॅन्सला देखील खूप वाईट वाटले. श्रीदेवी यांचे दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये निधन झाले होते.

मात्र या क्षेत्राच्या नियमाप्रमाणे ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत जान्हवीने या सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आणि जुलै 2018 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाला जरी सरासरी प्रतिसाद मिळाला असला तरी जान्हवीच्या करियरची गाडी मात्र सुसाट वेगाने धावू लागली. तिने सिनेमा येण्याआधीच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सिनेमा आल्यानंतर तिचा फॅन फॉलोविंगमध्ये आणखीनच भर पडली.

धडक सिनेमानंतर जान्हवी 2020 मध्ये नेटफ्लिक्सच्या ‘घोस्ट स्टोरीज’या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली. यात तिने झोया अख्तरच्या शॉर्ट फिल्ममधे समीराची भूमिका साकारली होती. या दरम्यान ती अनेक जाहिराती आणि काही सिनेमातील गाण्यांमध्ये सुद्धा दिसली. यानंतर जान्हवीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा होता, ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’. बायोपिक असणाऱ्या या सिनेमाकडे फॅन्ससोबतच इंडस्ट्रीमधल्या सर्वांचेच लक्ष लागले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

मात्र 2020मध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’ हा सिनेमा चित्रपटगृहांऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले आणि हा सिनेमा ऑगस्ट 2020मध्ये नेटफिल्क्सवर प्रदर्शित झाला. ह्या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या सिनेमानंतर जान्हवीच्या अभिनयावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना तिने या चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले.

जान्हवीला तिचा करियरच्या सुरुवातीला अनेकांच्या टीकेला सुद्धा सामोरे जावे लागले. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या नेपोटीझमच्या आरोपांमुळे अनेकांनी जान्हवीवर सडकून टीका केली. मात्र तिने कधीही लोकांच्या टीकेला उत्तर देणे महत्वाचे समजले नाही. (shridevis daughter jahanvi kapoor bollywood journey)

महत्त्वाच्या बातम्या-
आई श्रीदेवीपासून प्रेरित होऊन जान्हवी कपूरने ‘हा’ लाखमोलाचा सल्ला अजूनही ठेवलाय लक्षात, वाचा
शाहरुखच्या लेकीने कृतीतून जिंकले मन! भीक मागायला आलेल्या महिलेला मोठ्या मनाने दिले ‘एवढे’ रुपये, Video Viral

हे देखील वाचा