Friday, March 29, 2024

अर्रर्रर्र..! टॅटू दाखवण्याच्या नादात श्रुती हसन झाली टॉपलेस, फोटो पाहून तुम्हालाही फुटेल घाम

अनेक कलाकारांना त्यांची ओळख त्यांच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरून सर्वाधिक मिळते. त्यांचे चाहते देखील त्यांची प्रत्येक पोस्ट बघण्यासाठी उतावीळ झालेले असतात. त्यात अभिनेत्री अनेकवेळा त्यांचे बोल्ड फोटोस सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन ही देखील सोशल मीडियावर मोठ्या संख्येने सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या ग्लॅमरस लूकचे दर्शन ती वारंवार तिच्या चाहत्यांना देत असते. अशातच तिचा एक टॉपलेस फोटो समोर आला आहे. जो पाहून तिचे पाहून सातत्याने कमेंट्स करत आहेत.

श्रुतीने अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती टॉपलेस दिसत आहे. या फोटोमध्ये खरंतर तिला तिच्या बॉडीवरील टॅटू दाखवायचा आहे. तिने तिच्या पाठीवर हा टॅटू काढला आहे. तिने तमिळ भाषेमध्ये तिचे नाव कोरले आहे. तिने हा टॅटू दाखवण्यासाठी तिचे सगळे केस एका बाजूला घेतले आहेत. तसेच हा फोटो देखील मागच्या बाजूने काढलेला आहे. (shruti haasan shared photo of her tattoo and gone topless)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझं नाव घ्या, जोरात बोला.” तिचा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर हार्ट तसचे फायर इमोजी पोस्ट करत आहेत. तसेच काहीजण तिने काढलेल्या टॅटूचा अर्थ विचारत आहेत. तिच्या या फोटोला चार लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच एक हजारांपेक्षाही जास्त कमेंट्स आल्या आहेत.

श्रुती ही दिग्गज अभिनेते कमल हासन यांची मुलगी आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत तिचे नाव कमावले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. ती लवकरच प्रभाससोबत ‘सालार’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. याआधी ती ‘द पावर’ या चित्रपटात दिसली आहे. तिचा हा चित्रपट या वर्षी झी ५ वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली होती. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने शेअर केलेल्या टॉपलेस फोटोंची जोरदार चर्चा चालू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्याने विचारले, ‘आतापर्यंत किती ब्रेकअप झाले?’ मजेदार अंदाजात उत्तर देत, श्रुती हासन म्हणाली…

आई-वडिलांच्या घटस्फोटाचे ऐकून खुश झाली होती श्रुती हासन, खुद्द अभिनेत्रीने सांगिलतंय यामागचं कारण

हे देखील वाचा