टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तसेच तिचे वैयक्तिक आयुष्यही संघर्षांनी भरलेले आहे. एवढे सगळे असून देखील या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री २ दशकांहून अधिक काळ अभिनय जगताचा एक भाग आहे. आता अशी बातमी समोर आली आहे की, ती लवकरच मोठ्या पडद्यावरही धमाल करणार आहे.
खरं तर, श्वेता तिवारीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) प्रोडक्शन अंतर्गत एका मोठ्या चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. श्वेताचा जिवलग मित्र विकास कलंत्री यांनी केलेल्या पोस्टद्वारे ही माहिती मिळाली असून, त्यांनी अभिनेत्रीला नवीन सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये विकास कलंत्री यांनी लिहिले आहे की, “नवीन सुरुवात… ऑल द बेस्ट श्वेता तिवारी.” यानंतर श्वेताने देखील विकास यांची ही पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या पोस्टवर रोहित शेट्टीचे नावही लिहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता तिवारी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या स्टंट बेस्ट रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये स्पर्धक म्हणून शेवटची दिसली होती. श्वेताने या शोमध्ये अनेक धोकादायक स्टंट केले. या शोदरम्यान रोहित शेट्टी आणि श्वेता तिवारी यांच्यात चांगलीच बॉन्डिंग पाहायला मिळाली.
प्रेरणा या नावाने ओळखले जाते घरोघरी
श्वेता तिवारी वर्षानुवर्षे छोट्या पडद्यावर राज्य करत आहे, यात शंका नाही. तिने १९९९ मध्ये करिअरला सुरुवात केली. २००१-२००८ पर्यंत चाललेल्या ‘कसौटी जिंदगी की’ या सुपरहिट टीव्ही शोमध्ये तिने प्रेरणा शर्मा बजाजची भूमिका साकारली होती. तिच्या या शोच्या माध्यमातून श्वेताने प्रत्येक घराघरात तिची खास ओळख निर्माण केली. या शोनंतर ती ‘परवरिश’, ‘बेगुसराय’ आणि ‘मेरे डॅड की दुल्हन’ यासह टेलिव्हिजन मालिकांचा भाग बनली. टेलिव्हिजन व्यतिरिक्त त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, आजही असे बरेच लोक आहेत जे अभिनेत्रीला केवळ प्रेरणा म्हणून ओळखतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –










