श्वेता तिवारीचा हॉट डान्स व्हिडिओ पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एक नजर टाकाच

श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) तिचा नुकताच केलेला डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती ‘चांद बालियां’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने छान मेकअप केला आहे. यात तिचे केस मोकळे आहेत आणि ती कॅमेऱ्याकडे बघून डान्स करत आहे. यात तिच्या अदा अगदी पाहण्यासारखी आहे. व्हिडिओ शेअर करत श्वेता तिवारीने कॅप्शनमध्ये ‘चांद बालियां’ लिहिले आहे.

व्हिडिओ झाला व्हायरल
श्वेता तिवारीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. त्याला ६ तासांत ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर त्यावर ४०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी त्यावर हार्ट आणि फायर इमोजी शेअर केल्या आहेत. (shweta tiwari shares hot dance video on song chand baliyaan)

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

सोशल मीडियावर असते सक्रिय
श्वेता तिवारी ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. तिच्या भूमिकांना खूप पसंती मिळाली आहे. श्वेता तिवारी लवकरच अनेक शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिने ‘बिग बॉस’चा शो देखील जिंकला आहे. श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते, यामुळे तिचे चाहतेही उत्साहित असतात.

मुलगी पलक तिवारी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
सध्या ती आपल्या मुलीच्या पदार्पणासाठी खूप उत्सुक आहे. खरं तर श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. तर तिने हार्डी संधूसोबत ‘बिजली- बिजली’ गाण्यात स्क्रीन शेअर केली आहे.

Latest Post