Wednesday, July 3, 2024

‘…घंटा एकही कॅप्शन सुचलं नाही’, म्हणत सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला फोटो; पाहा

सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे. आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारत त्याने यशाचे शिखर गाठले आहे. या दिवसांत इतर कलाकारांप्रमाणे सिद्धार्थही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहतो. त्याच्या पोस्टला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतं. नुकताच त्याने शेअर केलेला फोटो आणि त्यासोबतच त्याखालचे कॅप्शन बरेच पसंत केले जात आहे.

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो खिडकीजवळ बसलेला दिसत आहे. खिडकीतून खाली बघत तो काहीतरी विचार करतोय, असं या फोटोतून लक्षात येत आहे. मात्र फोटोसोबत याचं कॅप्शनही भलतंच चर्चेत आलं आहे.

हा फोटो शेअर करत सिद्धार्थ कॅप्शनमध्ये म्हणतोय की, “शप्पथ सांगतो अर्धा पाऊण तास विचार केला. गूगल बीगल केलं, चार पाच जुनी गाणी आठवली, शेजारी पाजारी विचारलं..घंटा एकही कॅप्शन सुचलं नाही. तुम्हीच बघा आता.” सोबतच हा फोटो मृण्मयी देशपांडेने काढला आहे, असेही त्याने सांगितले आहे. फोटो पाहून मृण्मयीनेही अतिशय मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. फोटोवर कमेंट करत मृण्मयीने लिहिलं आहे की, “माझ्या मागे लागला होता माझा एक candid फोटो काढ म्हणून…असा असतो का candid!?” चाहत्यांना देखील हा फोटो चांगलाच पसंत पडला आहे.

सिद्धार्थने २००७ साली ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर वयाच्या १९व्या वर्षी त्याने अवधुत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याला ‘क्लासमेट’ चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी ओळखले जाते. याशिवाय त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून, प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा