×

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी पॅरोलवर जेलमधून बाहेर, ‘या’ कारणामुळे मंजुर झाली रजा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर मागील एक वर्षापासून त्याची चौकशी चालू आहे. यात ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाल्यामुळे त्याचा जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आले होते. सिद्धार्थचे लग्न असल्यामुळे आता कोर्टाने त्याला काही दिवसासाठी पॅरोल दिला आहे. त्याचे लग्न येत्या 26 जूनला होणार आहे. त्यामुळे त्याने कोर्टाकडे लग्नासाठी घरी जाण्यासाठी मागणी केली होती. त्याची ही मागणी मान्य करून त्याला काही दिवसांचा पॅरोल मिळाला आहे.

सिद्धार्थ पिठानीचे वकील तारिक सय्यद यांनी सांगितले की, “त्याला मानवतियेच्या आधारावर पॅरोल दिली आहे. तो 2 जुलैला पुन्हा आत्मसमर्पण करणार आहे.” नारकोटिस्क कंट्रोल ब्यूरोचे जोनार डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, सिद्धार्थला जामीन नाही मिळाला तर त्याला त्याच्या लग्नासाठी 10 दिवसांचा पॅरोल रजा मिळाली आहे. सिद्धार्थला एनसीबीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ट्रेस केले होते. सुशांत सिंग राजपूत ड्रॅग्स प्रकरणात 28 मेला त्याला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती.

सिद्धार्थ हा असा पहिला व्यक्ती होता ज्याने मागच्या वर्षी सुशांत सिंगला त्याच्या बेडरूममध्ये लटकलेले पाहिले होते. सुशांतच्या घरी त्यावेळी पोलीस येण्यापुर्वी त्याने सुशांतची बॉडी खाली घेतली होती. एनसीबीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया, भाऊ भोविक, सॅमुअल मिरांडा आणि दिपेश सावंत या लोकांना देखील अटक केले होते. सुशांत सिंगच्या‌ घरातील इतर लोक केशव आणि नीरज यांची देखील चौकशी झाली आहे.

बॉलिवूडमध्ये वेगाने प्रगतीच्या दिशेने जाणारा प्रतिभावान अभिनेता सुशांत सिंगचे मागच्या वर्षी 14 जूनला त्याच्या राहत्या घरी निधन झाले आहे. त्याची आताच पहिली पुण्यतिथी साजरी झाली आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी तसेच बॉलिवूडमधील कलाकारांनी सोशल मीडियावर त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नीना गुप्ता यांनी करिअरच्या सुरुवातीला केला होता कास्टिंग काऊचा सामना; ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितला त्या रात्रीचा किस्सा

-पाकिस्तानी अभिनेत्रीच्या आईचे झाले अपहरण; संपत्तीच्या वादामुळे पंतप्रधानांकडे मागितली मदत

-सोनू कक्करही झाली ‘इंडियन आयडल १२’ मधील अरुणिताच्या आवाजाची दिवानी; दिली तिला ‘ही’ खास भेट

Latest Post