Monday, June 24, 2024

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ‘शेरशहा’ सिनेमातील, ‘रातां लम्बियां’ गाण्याने रचला इतिहास

चित्रपटातील गाण्यांसोबत प्रेक्षकांचे एक वेगळेच नाते असते. गाणी आणि सिनेमा हिट हे नवीन समीकरण आता रूजायला सुरूवात झाली आहे. गाणी हा सर्वच लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. सिनेमा चालेल की नाही हे तर नंतर समजते मात्र सिनेमातील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच प्रेक्षकांच्या ओठांवर रुळायला लागतात. बॉलिवूडच्या शतकीयपेक्षा अधिकच्या इतिहासात अगदी ७०/८० वर्षांपूर्वीची गाणी आज देखील तितक्याच आवडीने ऐकली जातात. सिनेमे जरी प्रेक्षक विसरले तरी गाणी अनेक दशकं ताजीतवानी असतात. आजच्या आधुनिक काळातील गाण्यांमध्ये पूर्वीच्या गाण्यांइतकी गोडी जरी जाणवत नसली तरी काही गाणी मात्र याला अपवाद आहेत. सिनेमा प्रदर्शनाच्या अनेक महिन्यानंतरही गाण्याची जादू प्रेक्षकांना बांधून ठेवते. याचे उत्तम उदाहरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.

काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशहा’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. सिनेमाने तर तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. याच सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थला यशाची चव चाखता आली. हा सिनेमा कथेमुळे चालला हे तर नक्कीच खरे आहे, मात्र चित्रपटातील गाण्यांनी देखील अमाप प्रेम मिळवले. या सिनेमातील प्रत्येक गाणे एक गोष्ट सांगणारे होते. असेच एक गाणे म्हणजे ‘रातां लम्बियां.’ या गाण्याने सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर केवळ तीन महिन्यात एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

‘रातां लम्बियां’ या गाण्याला १ बिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याची माहिती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे. सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “शेरशहाला तुम्ही दिलेल्या अतूट प्रेमाला पाहून मी खूपच अभिभूत आणि भावुक झालो आहे. ‘रातां लम्बियां’ गाण्याला १ बिलियन व्ह्यूजसाठी तुमचे खूप आभार.” या गाण्याला मिळणारे प्रेम पाहून आपण अंदाज लावू शकतो की, या दोघांच्या सिनेमाला अजूनही किती प्रेम मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा