Friday, April 19, 2024

ऍक्शन किंग रोहित शेट्टीचा हिरो होणे खायचे काम नाही, शूटिंग दरम्यान जखमी झाला सिद्धार्थ मल्होत्रा

लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा रोहित शेट्टीच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसिरीजमध्ये दिसणार असल्याचे सर्वानाच माहित आहे. सध्या या सिरीजचे शूटिंग चालू असून, या सिरीजमध्ये तुफान ऍक्शन दिसणार आहे. रोहित शेट्टी नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये ऍक्शनसाठी ओळखला जातो आता या वेबसिरीजमध्ये त्याच्या चित्रपटांमधील ऍक्शनपेक्षा अधिक ऍक्शन दिसणार आहे. नुकताच एका ऍक्शन सिक्वेन्सचे शूटिंग झाले आणि याच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सिद्धार्थ मल्होत्रा ‘इंडियन पुलिस फोर्स’या सिरीजच्या ऍक्शनचे गोव्यामध्ये शूटिंग करत आहे. याचा एक व्हिडिओ सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ एका ऍक्शन सीनची शूटिंग करत असून, रोहित शेट्टी कॅमेरा सांभाळताना दिसत आहे. या सीनमध्ये सिद्धार्थ कोणालातरी जोरदार मारताना दिसतो. मात्र यातच काही काचेचे तुकडे त्याला टोचतात आणि त्याच्या हातातून रक्त येते.

सिद्धार्थने रोहित शेट्टीसोबत एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये रोहित त्याच्या हातावर झालेल्या जखमा आणि त्यातून येणारे रक्त दाखवत आहे. या सेल्फीला शेअर करत सिद्धार्थने लिहिले, “रोहित शेट्टीचा ऍक्शन हिरो खरे रक्त आणि घाम घालतो. रोहित सरांसोबत गोव्यामध्ये काही क्रेझी ऍक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान काम करताना.”

‘इंडियन पुलिस फोर्स’ ही सिद्धार्थ मल्होत्राची पहिलीच वेबसिरीज असून या वेबसिरीजच्या माध्यमातून रोहित आणि सिद्धार्थ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. या सिरीजमध्ये सिध्दार्थसोबत शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच ‘मिशन मजनू’ नावाच्या सिनेमात दिसणार असून यात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा