जेव्हा सिद्धार्थ शहनाझला म्हणाला, ‘तू एक सिगारेटसारखी आहे, तरीही मी नशा करतो…’ वाचा तो किस्सा

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा गुरुवारी (२ सप्टेंबर) वयाच्या ४० व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सकाळीच त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ रात्री गोळ्या खाऊन झोपला होता. पण अजूनही त्याच्या मृत्यूचे खरे कारण माहित झाले नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर आता त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पण अजूनही पोलिसांची याबाबत चौकशी चालू आहे. तसेच त्याच्या परिवाराची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी चालू आहे.

आतापर्यंत त्याच्या घरच्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. आता असा अंदाज लावला जात आहे की, रात्री झोपल्यानंतर त्याला झटका आला असावा. बुधवारी रात्री तो एकदम ठीक होता, पण रात्री तो औषध खाऊन झोपला आणि सकाळी उठलाच नाही. त्याच्या घरातील लोक त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्याची बहीण आणि दाजीने त्याला रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थने छोट्या पडद्यासोबत चित्रपटात देखील काम केले आहे. तो टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. ‘बिग बॉस १३’ चा विजेता झाल्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. त्याच्या मृत्यूनंतर आता सगळेजण शोक व्यक्त करत आहेत. (sidharth shukla always stood up for rumoured girlfriend shehnaaz gill)

सिद्धार्थ आणि शहनाझ गिल हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या या मैत्रीवरून अनेकवेळा त्यांच्यामध्ये अफेअर आहे, अशा चर्चा चालू होत्या. परंतु या गोष्टीचा त्या दोघांनी काहीही खुलासा केला नाही. परंतु त्यांची जोडी ‘सिडनाझ’ या नावाने लोकप्रिय आहे. त्या दोघांची भेट ‘बिग बॉस’च्या घरात झाली होती. तेथूनच त्यांच्यात अतूट मैत्री तयार झाली. सोशल मीडियावर देखील कधी कधी त्यांच्या जोडीला ट्रोल केले जात होते. पण सिद्धार्थने नेहमी शहनाझची बाजू घेतली आहे. ‘बिग बॉस’मध्ये असताना तो एकदा म्हणाला होता की, “शहनाझ तू माझ्यासाठी सिगारेटसारखी आहे. मला माहित आहे तू मला बरबाद करत आहेस. पण तरीही मी ही नशा करतो.”

सिद्धार्थने त्याच्या एका मुलाखतीत तो असं का बोलला होता याचे स्पष्टीकरण देखील दिले होते. त्याचे असे म्हणणे होते की, शहनाझ घरात नेहमी त्याच्याशी भांडत असते. त्यामुळे सिद्धार्थला पूर्ण वेळ तिला समजवावे लागत असायचे आणि शहनाझ चिडल्यावर सिद्धार्थचा मूड देखील खराब होत असायचा.

सिद्धार्थचे असे म्हणणे होते की, बिग बॉसच्या घरात शहनाझ एकटीच अशी होती, जिच्यासोबत तो जास्त वेळ घालवत होता. यामुळेच त्याने तिच्याबद्दल असे वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता, “मी बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधी खूप घाबरलो होतो.”

त्याचे असे म्हणणे होते की, तो कसा जिंकला हे त्याला देखील माहित नाही. तो म्हणाला होता, “लोकप्रियतेशिवाय काहीही बदल झाला नाही. मी आधी जसा होतो तसाच आहे.” त्याचे असे म्हणणे होते की, ज्या दिवशी त्याने हा शो साईन केला होता, तेव्हा त्याचे लक्ष केवळ बिग बॉसची ट्रॉफी एवढेच होते. तो म्हणाला होता, “बिग बॉसचे घर एक अशी जागी आहे, जी तुम्हाला अग्रेसिव्ह बनवते. एका घरात राहायचे म्हटल्यास तुम्हाला सगळ्यांशी बोलावेच लागते.”

त्याच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

Latest Post