Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थला सोशल मीडियावर होते लाखो फॉलोवर्स, पण तो फक्त ‘या’ सहा लोकांनाच करायचा फॉलो

सिद्धार्थ शुक्लाने २ सप्टेंबर रोजी अचानक या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाची बातमी ऐकून टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील इंडस्ट्रीमधील कलाकारांसोबत प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला. सिद्धार्थच्या अकाली निधनामुळे त्याच्या कुटुंबावर कोसळल्या दुःखाच्या डोगरातून सावरण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी सर्वच लोकं प्रार्थना करत आहे. सिद्धार्थ इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय नसायचा. तरी त्याला लाखो नेटकरी फॉलो करायचे. मात्र सिद्धार्थ सोशल मीडियावर फक्त सहा लोकांनाच फॉलो करत होता. 

सिद्धार्थला सोशल मीडियापासून दूर राहणे आवडत असल्याचे त्याने अनेक वेळा सांगितले होते. तो म्हणायचा की शहनाझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि तो तिच्याकडून नवनवीन गोष्टी शिकत असतो. तसेच, सिद्धार्थ इंस्टाग्रामवर नवीन असल्यामुळे तो फार सक्रिय नव्हता, तरीही या व्यासपीठावर चाहत्यांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. इंस्टाग्रामवर सिद्धार्थचे ४.४ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर फॉलोअर्स वाढत गेले. पण तो फक्त ६ जणांना फाॅलो करत होता आणि ते त्यांच्यासाठी प्रचंड खास होते. आज आपण या लेखातून जाणून घेऊया त्या सहा लोकांविषयी.

शहनाझ गिल :
शहनाझ गिल सिद्धार्थ शुक्लाच्या किती जवळ होते हे कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघांची मैत्री खूप खास होती. ‘बिग बॉस १३’ च्या घरात बनलेले हे खास नाते घराबाहेरही तसेच राहिले. दोघांची मैत्री लोकांसाठी एक उदाहरण बनली होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाझ प्रचंड दु:खावली गेली.

मनीष मल्होत्रा
मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे सिद्धार्थला खूप आवडायचे. याविषयी सिद्धार्थने अनेकदा आपले मत व्यक्त केले होते. त्याने दिवाळीच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, “आपल्या सर्वांना मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान करायचे असतात. ​तुमच्यासारखे मला पण हे कपडे परवडत नाही, पण या दिवाळीत मी माझे आवडते डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी तयार केलेली कपडे ​परिधान केले आहे. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.” तसेच मनिषलाही सिद्धार्थ प्रचंड आवडतं होता.

https://www.instagram.com/p/CSWNUVsIZDa/?utm_source=ig_web_copy_link

एकता कपूर
सिद्धार्थला टीव्ही इंडस्ट्रीतला सुपरस्टार म्हटले जाते. सिद्धार्थ इंस्टाग्रामवर टीव्ही क्वीन एकता कपूरला फॉलो करत आहे. एकताने वेब प्लॅटफॉर्मवर सिद्धार्थला काम करण्याची पहिली संधी दिली. सिद्धार्थ ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ मध्ये दिसला होता.

केन फर्न्स
केन फर्न्स सिद्धार्थचा आवडता डिझायनर आहे. केनने ‘डान्स दिवाने ३’ शो मधील सिद्धार्थचे कपडे डिझायनर केले होते. ‘डान्स दिवाने ३’ शो मध्ये सिद्धार्थ शेवटचा दिसला होता‌. शाहनाझ ही केनने डिझायन केलेले कपडे परिधान करते. केनन टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

कलर्स
सिद्धार्थ इंस्टाग्रामवर कलर्स चॅनलला फॉलो करायचा. यामागचे कारण म्हणजे त्याने अनेक वर्षे या वाहिनीसोबत काम केले. चॅनेल सुरू झाल्यानंतर त्यांने ‘बालिका वधू’ या सुरुवातीच्या शोमध्ये शिवची भूमिका साकारली. तेव्हापासून त्याचे नाते या वाहिनीशी जोडले गेले. या मालिकेतून सिध्दार्थने प्रसिद्ध मिळवली‌.

एंडेमॉल शाइन इंडिया
‘बिग बॉस’ आणि इतर अनेक शो एंडेमॉल शाइन इंडिया प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनवले जातात. सिद्धार्थ या प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित होता, त्यामुळे तो इंस्टाग्रामवर हे पेज फॉलो करायचा.

सिद्धार्थचे फॉलोवर्स नक्कीच वाढले पण तो फक्त या सहा लोकांनाच फॉलो करत होता.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा