सोशल मीडिया ट्रोलर्सवर भडकली आस्था गिल; म्हणाली, ‘कलाकारांना ट्रोल करणे…’


बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात काय घडते याची माहिती सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. चाहते देखील त्यांच्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण कधी कधी कलाकार असं काही बोलतात की, त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक वेळा ते अशा मुद्यांवर बोलतात जे बोलायच्या आधी त्यांना प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करावा लागतो. तसं पाहायला गेलं, तर सोशल मीडिया एक मुक्त व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येकजण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतो. याबाबत गायिका आस्था गिल भडकली असून तिने आपले विचार मांडले आहेत. (Singer aastha Gil support bollywood actors on social media trolling)

माध्यमातील वृत्तानुसार, आस्था गिल असे म्हणते की, “जर तुम्हाला माहिती आहे की, कलाकार फोटो शेअर करून सर्वत्र आनंद पसरवत असतात. मग तुम्ही त्यांच्यावर अशाप्रकारे दबाव नाही आणला पाहिजे. लोकं लगेच त्यांना ट्रोल करायला सुरुवात करतात. कोणाच्याही एका फोटोने कोणीही प्रभावित होत नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश नसाल, तर एक फोटो पोस्ट करून कोणाच्याही आयुष्यात काही चांगले किंवा वाईट घडणार नाहीये. हा एक फक्त आनंद पसरवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे मला असं वाटत की, कलाकारांना ट्रोल करणे ही चांगली गोष्ट नाहीये.”

गायिका आस्था गिल ही लवकरच टीव्ही रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे. ती नुकतेच दक्षिण आफ्रिका केपटाऊनवरून ‘खतरों के खिलाडी 11’ शोची शूटिंग करून परत आली आहे. या शोच्या सेटवर अर्जुन बिजलानीने आस्था गिलसोबत ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे री-क्रिएट केले आहे. याचा व्हिडिओ ‘झांसी की राणी’ फेम अनुष्का सेनने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच तिने लिहिले आहे की, “बघा बघा.”

या व्हिडिओमध्ये आस्था गिल आणि अर्जुन बिजलानी काळ्या रंगाच्या छत्रीखाली या गाण्याला रि-क्रिएट करताना दिसत आहेत. अनुष्का सेनने हा व्हिडिओ शूटिंगदरम्यान बनवला आहे. यासोबत आस्था गिलचे ‘पाणी पाणी’ हे गाणे नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. या गाण्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि रॅपर बादशाह यांची जोडी दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.