Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड मोठी बातमी! प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात, मुंबईतील रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात, मुंबईतील रुग्णालयात दाखल

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल याचा अपघात झाला आहे. गुरुवारी (दि. 01 डिसेंबर) जुबिन पायऱ्यांवरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या कोपऱ्याला गंभीर इजा झाली. याव्यतिरिक्त त्याच्या पायावर, बरगड्यांवर आणि डोक्यावरही मार बसला आहे. जुबिनला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नुकतेच गायक जुबिन नौटियाल याचे नवीन गाणे ‘तू सामने’ हे रिलीज झाले आहे. या गाण्यासाठी त्याच्यासोबत गायिका योहानी (Yohani) हिनेदेखील आपला दिला होता. गुरुवारीच जुबिन आणि योहानी यांना या गाण्याच्या लाँचवेळी स्पॉट करण्यात आले होते. यानंतर त्याला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला आपल्या उजव्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल असे बोलले जात आहे. त्याला डॉक्टरांनी आपल्या उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील आठवड्यात दुबईतील कॉन्सर्टमध्ये होता गायक
मागील आठवड्यात जुबिन दुबईत लाईव्ह कॉन्सर्टसाठी गेला होता. याविषयी बोलताना तो म्हणाला होता की, “दुबईतील उत्साही गर्दीसाठी परफॉर्म करण्याचा मला नेहमीच आनंददायी अनुभव आला. मी तिथे परफॉर्म करण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सक्षम आहे.”

पुढे बोलताना जुबिन म्हणाला की, “काही दिवसांनंतर हा सणाचा हंगाम असेल. तसेच, हा उत्सव सुरू करण्यासाठी आणि याचा उत्साह उंच ठेवण्यासाठी मी यापेक्षा चांगल्या मार्गाचा विचार करू शकत नाही.”

जुबिन नौटियालची गाणी
सुरुवातीला नकार सहन करणाऱ्या जुबिनने खूप मेहनतीने नाव कमावले आहे. त्याचा आवाज चाहत्यांना खूपच भावतो. त्याच्या आवाजातील गाणी चाहते लूपवर लावून ऐकतात. त्याने गायलेली गाणी सुपरहिट ठरली आहेत. त्यामध्ये ‘राता लंबिया’, ‘लुट गये’, ‘हमनवा मेरे’, ‘तुझे कितना चाहने लगे हम’, ‘तुम ही आना’ आणि ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ यांसारख्या बऱ्याच गाण्यांचा समावेश आहे. (singer jubin nautiyal accident rushed to hospital in mumbai read more)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फीफामध्ये लाईव्ह परफॉर्म करणाऱ्या नोरासोबत अश्लील कृत्य, घडला प्रकार व्हिडिओत कैद
शहनाझच्या हृदयात अजूनही जिवंत आहे सिद्धार्थ, आठवण काढत कॅमेऱ्यासमोरच रडली ढसाढसा

हे देखील वाचा