Wednesday, July 3, 2024

कनिकाने ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांची घेतली भेट, साेशल मीडियावर असा व्यक्त केला आनंद

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी अलीकडेच ब्रिटनमधील सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. बुधवारी (दि. 26 ऑक्टाेबर)ला त्यांचा पंतप्रधान म्हणून संसदेतील पहिला दिवस होता. ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाल्यापासून त्यांना जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीयांमध्ये विशेषत: उत्साह आहे. पंतप्रधान झाल्याची बातमी आल्यापासून अनेक चित्रपट कलाकारांनी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांचे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनंदन केले आहे.

ऋषी सुनक (rishi sunak) यांना शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूर (kanika kapoor) हिचेही नाव जोडले गेले आहे. बॉलिवूड गायिका कनिका कपूरने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कनिका ऋषी सुनक यांना भेटताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor)

लंडनमधील फेअरमॉंट विंडसर पार्क येथे चौथ्या वार्षिक यूके-इंडिया पुरस्कार कार्यक्रमाचे (fourth annual UK-India Awards VIP ceremony) आयोजन करण्यात आले होते. ज्यात अतिथी ऋषी सुनक होते. याच कार्यक्रमात, बॉलीवूड गायिका कनिका कपूर हिला यूके-भारत सांस्कृतिक संबंधातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या खास प्रसंगी त्यांनी ऋषी सुनक यांचीही भेट घेतली.

अलीकडेच कनिका कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर ऋषी सुनकसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पीएमसोबत बोलताना दिसत आहे. कनिकाने तिच्या इंस्टा वर ऋषी सुनकसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत, एका फोटोमध्ये ती ऋषी सुनकसोबत पोज देताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. हे फाेटाे पोस्ट करत तिने लिहिले, “ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटणे अभिमानास्पद होते.”

ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाल्याची बातमी 25 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी या बातमीवर ट्विट करून आनंद व्यक्त केला होता. अनुपम खेर यांनीही भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये सत्तेची सूत्रे हाती घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शासनामध्ये कोणत्याच धर्माला स्थान नसले पाहिजे,’ म्हणत संगितकार विशाल ददलानीने केजरीवालवर केली टीका

‘मुस्लिम देशात लाऊडस्पीकरवर अजानला बंदी मग आपल्याकडे का नाही?’, प्रसिद्ध भक्तीगीत गायिकेचा रोखठोक सवाल

हे देखील वाचा