बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अनुपम खेर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयाने भुमिका गाजवल्या आहेत. त्यांनी ‘डीडीएलजे’ सारख्या लोप्रिय चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या, आजही त्यांच्या भूमिकांचे कौतुक केले जाते. अभिनेता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते सतत नवनवीन पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांचे मनोरंज करत असतात. त्यांची नुकतंच एक पोस्ट सोसळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी यापूर्वी अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. काही दिवसांपुर्वी त्यांनी एका बीएमसी महिला कामगारसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये स्पष्ट जाणून येत होते की, अभिनेता आपल्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करणयासाठी आवर्जून अभे असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केले आहेत.ज्यामुळे अभिनेत खूपच चर्चेत आले आहेत.
View this post on Instagram
अनुपम यांनी ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे काही फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटर शेअर केले आहेत. त्यासोबत ऋषी ब्रीटेनचे प्रधानमंत्री बणल्यामुळे त्यांनी आपले विचार देखिल व्यक्त केले आहेत. नुकतंच ब्रिटेनचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक हे झाले आहेत त्यामुळे अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच अभिनेता अनुपम खेर यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
अनुपम यांनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “प्रश्न हा नाही की ऋषी सुनक हिंदू आहे किंवा मुसलमान, सिख, ईसाई. गर्वाची गोष्टतर ही असायला पाहिजे की, एक मुलत: आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी भारतीय या देशाचे पंतप्रधान झाले आहेत, ज्यांनी जवळपास 200 वर्षे आपल्यावर राज्य केले. प्रत्येक भारतीयाने हे यश साजरे केले पाहिजे! जय हिंद.” अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “भारत माता की जय…वंदे मातरम् … मेरा भारत महान.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “मला भारतीय असल्याचे गर्व आहे..जय हिंद!”
View this post on Instagram
अभिनेत्याने या पूर्वीही अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या ज्या देशाशी निगडित असतील, अभिनेता नेहमी देशाल कोणताना कोणता संदेश देत असतात. ते आपले देशाप्रती विचार सतत चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ युजरने केली जया बच्चनची नक्कल, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल…
उर्फी जावेदच्या बोल्ड लुकने घडवली अद्दल, दिल्लीमध्ये नोंदवली तक्रार