Sunday, December 3, 2023

indian ideol 2023 | ‘इंडियन आयडल’मध्ये गायक कुमार सानू पहिल्यांदाच निभावणार परिक्षकाची भूमिका

indian ideol 2023 | सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल पुन्हा येत आहे, नवीन सत्र घेऊन आणि यावेळी सुप्रसिद्ध गायक कुमार सानू परीक्षकांच्या पॅनलमध्ये दाखल होत आहे. त्याच्यासोबत असतील श्रेया घोषाल आणि विशाल दादलानी. अत्यंत गाजलेल्या या शोने पुन्हा एकदा देशातील छुप्या गायकांचा शोध घेण्याचा चंग बांधला आहे. हा शो अशा गायकाच्या शोधात आहे, जो आपल्या मधुर कंठाने आणि मोहक गायकीने सगळ्यांना मोहित करू शकेल.

लोकांच्या या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून पदार्पण करत असल्याचा आनंद व्यक्त करताना कुमार सानू म्हणाले, “इंडियन आयडॉल हा आपल्या देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित गायन रियालिटी शो आहे. हा शो देशातील होतकरू गायकांना आपली कला आणि कौशल्य सादर करण्यासाठी आणि संगीत क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी एक भव्य मंच उपलब्ध करून देतो. इंडियन आयडॉलच्या प्रवासाचा साक्षीदार होताना खूप आनंद होत आहे कारण या कार्यक्रमात आपल्या देशातील उभरते कलाकार आपली क्षमता सादर करतात आणि भारतीय संगीत क्षेत्रात सामील होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकतात.”

kumar sanu
kumar sanu

ते पुढे म्हणाले, “या आधी या कार्यक्रमात मी अनेकदा अतिथी म्हणून आलेलो आहे, पण परीक्षकाची कामगिरी पार पाडणे हे माझ्यासाठी एक नवीन साहस आहे आणि या प्रवासासाठी मी उत्सुक आहे. बऱ्याचदा असे म्हटले जाते की, जिथे शब्द तोकडे पडतात, तिथे संगीत थेट आपल्या भावनांना भिडते. मी हे बघण्यास उत्सुक आहे की नव्या दमाचे गायक आपल्या सुर आणि तालाच्या जोरावर श्रोत्यांच्या भावना कशा प्रकारे प्रदीप्त करतात. या शोधात एक सच्चा हिरा आम्हाला सापडेल, जो आमचा आणि देशाचाही अभिमान बनेल, अशी मी आशा करतो.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
Nusrat jahan ED notice | अभिनेत्री नुसरत जहाँ यांना इडीकडून पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
राकेश रोशन यांनी ‘या’ कारणासाठी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले नाही काम

 

हे देखील वाचा