आतापर्यंत अनेक भोजपुरी गायकांनी आपल्या आवाजाने भोजपुरी चित्रपटसृष्टीला हिट गाणी दिली आहेत. त्यांची काही गाणी तर अशी असतात, जी काही क्षणातच व्हायरल होतात. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील गायक रितेश पांडे हा उत्कृष्ट आवाजासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो गायनाव्यतिरिक्त चित्रपटांमध्ये काम देखील करतो. रितेश आपल्या गाण्यांनी नेहमीच इंटरनेटवर राडा घालत असतो. नुकताच त्याचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. नुकतेच रितेश पांडेच नवीन नवरात्री स्पेशल देवीचे गाणे ‘नाच तारी भउजी पंडाल में’ प्रदर्शित झाले आहे. हे गाणे भोजपुरी वर्ल्डवाईड रेकॉर्ड्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच जबरदस्त व्हायरल होत आहे.
भोजपुरी चित्रपटाचे लोकप्रिय गायक आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहतात. रितेशही एक स्टायलिश गायक व अभिनेता आहे. त्याला भोजपुरी प्रेक्षकांकडून नेहमी प्रचंड प्रेम मिळते. ‘नाच तारी भउजी पंडाल में’मध्ये रितेश पांडे आपल्या साथीदारांसह देवीच्या दरबारात एक गाणे गाताना दिसत आहे. यासोबतच तो मध्येच त्याच्या डान्स मूव्हज देखील दाखवत आहे. प्रेक्षकांचा असा विश्वास आहे की, रितेशच्या आवाजात अशी जादू आहे की, त्याचा आवाज कानावर पडताच तो थेट हृदयापर्यंत जातो. यापूर्वी या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. रितेश पांडेचे चाहते यावर प्रचंड प्रतिक्रिया देत होते.
आता या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम आणि आशीर्वादही मिळत आहेत. हे गाणे लाखोंच्या संख्येने पाहिले जात आहे. एकाच दिवसात या गाण्याला २ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रितेशचे चाहते व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया करत आहेत.
वर्ल्डवाइड रेकॉर्ड प्रस्तुत ‘नाच तारी भउजी पंडाल में’ या गाण्याचे निर्माते रत्नाकर कुमार आहेत. आर आर पंकज यांनी हे गाणे लिहिले आहे. याचे संगीत छोटू रावत यांनी दिले आहे आणि रवी पंडित यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, या गाण्याची संकल्पना छोटन पांडेने मांडली आहे.
अलीकडेच, रितेशचे ‘लवंडिया लंदन से लाएँगे’ हे गाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाले होते. परंतु आजही या गाण्याला चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. त्याचबरोबर ‘मेहरारू दल बात नहीं’, ‘आज जेल हो कल बेल होई’ सारखी अनेक व्हिडिओ गाणी लाखो व्ह्यूजच्या क्लबमध्ये सामील झाली आहेत. ही सर्व गाणी यूट्यूबवर खूप धुमाकूळ करत आहेत. काही काळापूर्वी, त्याचे आणखी एक सिझलिंग गाणे ‘साठे घुमला पंडाल दिनभर दीर कीला लभारवा’ देखील यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याने देखील चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. प्रेक्षकांनी देखील या गाण्याला प्रचंड प्रेम व प्रतिसाद दिला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन
-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा
-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही