Thursday, April 18, 2024

अभिनेत्री किशोरी शहाणेंनी त्यांच्या मुलासाठी केली विनंती, म्हणाल्या, ‘त्याला त्याच्या टॅलेंटच्या…’

मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे या मराठी इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार एक आहेत. त्यांनी जवळपास ३५ वर्ष आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. त्या ‘बिग बॉस मराठी सीजन २’ मध्ये दिसल्या होत्या. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमातही काम करुन आपले नाव कमवले आहे. आणि त्या अजूनही आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहेत. पण जरी त्या  इंडस्ट्रीतला भाग असल्या तरी त्यांना त्यांचा २५ वर्षीय मुलगा बॉबी याच्या भविष्याची काळजी सतावत आहे. आणि तशी त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. किशोरी शहाणे यांना इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टी खटकतात. त्या गोष्टीचा जाहीरपणे विरोधही करतात.  पाहायला गेले तर त्यांच्या कुटुंबाचे आणि बॉलिवूडचे चांगले संबंध आहेत. पण तस म्हटल तर त्यांच बॉलिवूडबाबतीत फारसे चांगले मत नाही.

त्यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल भाष्य केले आहे. आपल्या मुलामध्ये अभिनयासाठी गरजेचे सगळे गुण आहेत. तो दिसायलाही चांगला आहे, परंतु त्याला अद्यापही ब्रेक मिळाला नाही. तो अजुनही स्ट्रगल करत आहे यांची खत त्यांनी व्यक्त केली आहे. त्या पुढे म्हणातात की, “तो लहान असल्यापासूनच थेएटरमध्ये काम करत आहे. आम्हाला वाटले त्याचं काम बघून त्याला ब्रेक मिळेल आणि जर आम्ही इतके दिवस इंडस्ट्रीत काम केले आहे. तर आमच्या मुलाला काम नक्की मिळायला हवं. त्याच्यात सगळे गुण आहेत जे एखाद्या अभिनेत्याकडे असायला हवेत त्याच्यामधील टॅलेंटवर आम्हाला विश्वास आहे. तो ज्याच्याकडे कामासाठी गेला आहे ते फक्त तासतास त्याच्यासोबत बोलतात पण पुढे काहीच घडत नाही. टॅलेट बघून काम द्या आमच्या नावावर काम देउ नका पण कमीतकमी संधी तरी द्या,” असे भाष्य त्यांनी केले आहे.

किशोरी शहाणे यांचे पती दीपक बलरज हे दिग्दर्शक त्याचा उल्लेख करत त्या आपल्या मुलाखतीत म्हणाल्या की, “माझ्या पतीने बाबा सेहगल, रोनित रॉनित रॉय, अली असगर अशा त्यावेळा नव्याने इंडस्ट्रीत काम करु पाहण्याऱ्या न्यू कमर्सला काम करण्यासाठी संधी दिली.” त्यांचा मुलगा बॉबी हा २५ वर्षाचा असून त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची खूप इच्छा आहे, परंतु त्याला अद्याप हवा तसा ब्रेक मिळाला नाही.

हेही वाचा 

हे देखील वाचा