Saturday, June 29, 2024

Happy birthday : म्हणून श्रेया घोषालने कधीही कोणत्या गायकाला केले नाही डेट, स्वतः केला खुलासा

श्रेया घोषाल ही बॉलिवूडची एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर आहे. बॉलिवूड,मराठी तसेच इतर अनेक भाषणामध्ये तिने अजरामर गाणी गायली आहेत. त्यामुळे ती मेलोडी क्वीन या नावाने प्रसिद्ध आहे. तिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सगळ्यांना खूप आवडतो. लहानपणापासूनच तिला संगीताची खूप आवड होती. अशातच रविवारी (12 मार्च)ला श्रेया तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग यानिमित्त जाणून घेऊया तिचा जीवनप्रवास.

श्रेयाचा जन्म 12 मार्च 1984 रोजी वेस्ट बंगालमध्ये झाले. तिचे शिक्षण राजस्थानमध्ये पूर्ण झाले. तिची आई शर्मिष्ठा घोषाल आणि वडील विश्वजित घोषाल यांच्यासोबत तिला लहानपणापासूनच गायनात आवड होती. तिला गायनाचे पहिले शिक्षण तिच्या आईकडून मिळाले. तिने आतापर्यंत 7 फिल्म फेअर अवॉर्ड, 4 नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंकले आहे. गायनासोबतच ती दिसायला देखील खूप सुंदर आहे. काम करताना तिला अनेकवेळा प्रपोज आले होते. परंतु तिने कोणालाही डेट केले नाही. ( Singer shreya ghosal celebrte her birthday, let’s know about her journey)

श्रेया घोषाल तिच्या आवाजाने गेले 20 वर्ष सगळ्यांना मंत्रमुग्ध करत आहे. तिने वयाच्या 16 व्या वर्षी ‘सारेगमप’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यात तिचा आवाज ऐकून सगळेच चकित झाले होते. त्यानंतर तिला संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपट गाणे गाण्याची संधी मिळाली आणि तिथून पुढे तिच्या करिअरला सुरुवात झाली.

अत्यंत सुंदर असणाऱ्या श्रेया घोषालने इतक्या वर्ष बॉलिवूड मध्ये काम केले. परंतु कधीही कोणता गायक किंवा संगीत दिग्दर्शकाला तिने डेट केले नाही. तिने 2015 साली शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी विवाह केला आणि ती तिच्या संसारात सुखी आहे. ते एक इंजिनियर आहेत. तिने बॉलिवूडमध्ये कधीही कोणाला डेट केले नाही यावर तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी कधीही कोणत्याही गायकाला किंवा संगीत दिग्दर्शकाला डेट केले नाही कारण जर तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीमधील व्यक्तीला डेट केले तर तुम्हाला त्यांचे विचार समजतात एक नवीन माहिती मिळते.”

त्यांनी एकमेकांना जवळपास 10 वर्ष डेट केले आहे. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्या दोघांनी नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. श्रेयाने तिच्या मुलीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ अभिनेत्रीने 32 व्या वर्षी एग्स फ्रीज करत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या यामागचे कारण

‘नापतोल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड असणाऱ्या सबा आझादला ट्रोल

हे देखील वाचा