मराठी ‘सारेगमप’ शोची विजेती आणि महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली भैसनेला सर्वच ओळखतात. वैशालीने तिच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. गायनासोबतच राजकारणातही सक्रिय असलेल्या वैशालीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे तिचे फॅन्स आणि महाराष्ट्रातील जनता काळजीत पडली आहे. वैशालीने अचानक फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
वैशालीने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे.आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.’ तिच्या या पोस्टमुळे नेटकरी आणि तिचे फॅन्स विचारत पडले आहे. हत्येचा कट रचल्याचे तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत तिच्याबद्दलची काळजी दर्शवली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वैशालीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेतेही या समारंभाला उपस्थित होते. वैशालीला विदर्भाचे विभागीय अध्यक्षपद देण्यात आले आहे.
मराठी ‘सारेगमप’ या स्पर्धेची विजेती ठरल्यानंतर वैशालीला हिंदी सारेगमप या शोसाठी विचारणा झाली. मात्र त्यावेळी वैशाली नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने तिने वाहिनीजवळ थोडा वेळ मागितला आणि डिलिव्हरीच्या एक महिन्यानंतर ती शोमध्ये सहभागी झाली. पुढे ती या शोची विजेती झाली. हिंदी सारेगमपचा महासंग्राम देखील तिनेच जिंकला. वैशालीने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये पार्श्वगायन केले असून, तिचे ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ गाणे तुफान गाजले. यासोबतच तिने ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणे देखील गायले आहे. याशिवाय वैशालीने अनेक मराठी मालिकांसाठी देखील पार्श्वगायन केले असून, तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- दिशा पटानी उचलले ८० किलोचे वजन, टायगर श्रॉफच्या बहिणीसोबत आईनेही केले तोंड भरून कौतुक
- Happy Birthday : एक चूक पडली महागात आणि जिया मानेकला सोडावी लागली ‘साथ निभाना साथीया’ मालिका
- Birth anniversary : असे काय झाले होते की, निम्मी ओळखल्या जात होत्या ‘अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’