Thursday, April 18, 2024

कोण आहे ती मुलगी जीने हनी सिंगचे नशीबच बदलवले?

यो यो हनी सिंगने काही दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड टीना थडानी हिची ओळख लोकांशी करून दिली. यासोबतच त्याने आपल्या नात्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले. टीना एक मॉडेल आहे. ती नुकत्याच रिलीज झालेल्या म्युझिक व्हिडिओ ‘पॅरिस का ट्रिप’मध्ये हनी सिंगसोबत दिसली होती. बिग बॉस ओटीटी फेम मिलिंद गाबाने हनी सिंगसोबत हा म्युझिक व्हिडिओ गायला आहे. मिलिंद आणि हनीचा हा म्युझिक व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. यामध्ये हनीची गर्लफ्रेंड टीनानेही चांगल्या मूव्स दाखवल्या आहेत. तिची हनी सिंगसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

हनी सिंगने (honey singh) आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “टीनामुळे तो खुप आनंदी आहे आणि टीनामुळेच त्याच्या आयुष्यात आनंद आला आहे. टीनाचे आयुष्य इतके बदलले आहे की, तिने स्वतःला हनी सिंग 3.0 म्हणणे सुरू केले आहे.” हनी सिंगने गर्लफ्रेंड टीनाला त्याची ‘प्रेरणा’ असल्याचे सांगितले आहे. यासाेबतच त्याने टीनासोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितले आहे.

हनी सिंग म्हणाला, “मी टीनामुळे खूश आहे. तिने माझे आयुष्य बदलले आणि मला तिसरा जन्म दिला. माझा तिसरा जन्म माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि टीनामुळे झाला आहे.” त्याने सांगितले की, “तो या वर्षी मार्चमध्ये टीनाला भेटला होता आणि तिला भेटण्यासाठी तो अनेक महिने तिचा पाठलाग करत होता.” हनी सिंग पुढे म्हणाला, “जेव्हा मला वाटतं की, ती माझी आहे, तेव्हा मी तिला मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.”

Yo-Yo-Honey-Singh
Photo Courtesy: Instagram/yoyohoneysingh

याआधी हनी सिंगने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “म्यूजिकने मला खूप मदत केली. जेव्हा मी लठ्ठ होतो तेव्हा मी शो केले नाहीत. मग मी शो करायला सुरुवात केली. मी लग्नाचे कार्यक्रम केले. मग कुठे गाेष्टी हळुहळु सुरळीत होऊ लागल्या. माझे वजन कमी झाले. मी माझी मूळ हेअरस्टाइल ठेवायला सुरुवात केली आणि हनी सिंग 3.0 बनलो.”

हनी सिंगने 2021 मध्ये पत्नी शालिनी तलवार हिला घटस्फोट दिला. (singer yoyo honey singh girlfriend tina thadani music video paris ka trip song)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

पोलखोल! लीप फिलिंगनंतर बिग बॉस फेम अर्शी खानने केली पुन्हा कॉस्मॅटिक सर्जरी?

हे देखील वाचा