Tuesday, February 18, 2025
Home अन्य गर्लफ्रेंड टिना थडानीला हनी सिंगने वाढदिवसाच्या दिल्या ‘रोमांटिक’ शुभेच्छा…

गर्लफ्रेंड टिना थडानीला हनी सिंगने वाढदिवसाच्या दिल्या ‘रोमांटिक’ शुभेच्छा…

बॉलिवूडमधील लेकप्रिय गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग याने आपल्या दमदार गाण्यांनी प्रेक्षकांवर राज्य केले आहे. सतत आपल्या हटके गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालानारा हनी सिंग सध्या लव्हलाइफमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. नुकतंच अभिनेत्याने एका पार्टीदरम्यान त्यची ग्रलफ्रेंड टीना थडानी हिच्यासोबतच्या नात्याला जगजाहीर केले आहे. त्या पार्टीमध्येही देघेही एकमेकांचा हात पकडून रोमांटिक मुडमध्ये पाहायला मिळाले. रविवार (दि, 11 डिसेंबर) रोजी टीनाने तिचा वाढदिवस साजरी केला आहे. यावर हनी सिंगने हटके अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग (Honey Singh) याने त्याची गर्लफ्रेंड टीना थडानी (Tina Thadani) हिचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हनी सिंगने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन स्टोरी शेअर करत कॅप्शन दिले “हैप्पी बर्थडे Jaana.” शेअर केलेल्या फोटोमध्ये टीना आणि हनी मिरर सेल्फी घेताना दिसून येत आहेत.

honey singh

हनी सिंग आणि त्याची पूर्व पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर काही दिसानंतर लगेच त्याने आपल्या नवीन नात्याची घोषणा केली आहे. त्याचं आगामी येणारं नवीन गाणं ‘हनी 3.0’ च्या लॉन्च पार्टीमध्ये त्याची गर्लफ्रेंड टीना थडानीला जगासमोर ओळख करुन दिली. हनी सिंगने सांगितले की, घटस्फोटानंतर टीनाने माला सांभाळले आणि मला ‘हनी 3.0’ असे नाव दिले आणि याच नावाचं हनी सिंगने त्याच्या आगामी येणाऱ्या गाण्याला टायटल दिले आहे.

टीना मुळची कॅनडामधील मॉडेल आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. अभिनय आणि मॉडेलिंग शिवाय तिला चित्रपट निर्मितीमध्येही आवड आहे. तिने एक शॉर्ट फिल्म The Leftoversची निर्मिती केली आहे. टीना सोशल मीडिवर खूप सक्रिय असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘कांतारा’ चित्रपटाच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘जळफळाट’ तर रिषभ शेट्टीने दिले धमाकेदार उत्तर
फायर है! ‘पठान’ चित्रपटीचं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा