Wednesday, June 26, 2024

ऐश्वर्यावाला सुंदरतेमध्ये मात देणारी ‘सिर्फ तुम’ फेम अभिनेत्री आहे तरी कुठे? जाणून घ्याच

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या लाईमलाइट पासून दूर गेल्या आहेत. काहींनी परदेशात आपला संसार थाटला आहेत तर काही आपल्या संसारात दंग झाल्या आहेत. भले या अभिनेत्री ग्लॅमरस दनियापासून लांब असल्या तर तरी त्या सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी जोडलेल्य असतात. असंच ‘सिर्फ तुम‘ फेम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया गिल गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. आज (दि, 7 फेब्रुवारी) रोजी प्रिया आपला वाढदिवस साजरा करत आहे. पण ही अभिनेत्री सध्या आहे तरी कुठे?

‘सिर्फ तुम’ (Sirf Tum) या चित्रपटातून ‘आरती’ नावाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी झोताता आलेली लोकप्रिय अभिनेत्रा प्रिया गिल (Priya Gill) अनेक वर्षापासून इंडस्ट्रीपासून लांब गेली आहे. बॉलिवूडध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या इंडस्ट्रीपासून  दुर गेल्या आहेत. मात्र, सोशल मीडियामुळे त्या सतत चाहत्यांच्या नजरेत असतात. अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या अभिनयातच नाही तर सोशल मीडियावरही सक्रिय नसतात. अशाच यादीमध्ये प्रिया गिलचेही नाव घेतले जाते जिला आजही सिर्फ तुम चित्रपटासाठी ओळखलं जातं.

प्रियाच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचे झाले तर तिने पंजाबी, मल्याळम, तामिळ, भोजपुरी, तेलुगू आणि हिंदी चित्रपाटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याशिवाय अभिनेत्री (1955) साली मिस इंडिया 2 नंबरची रनर-अप होती. प्रियाने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात (1996) साली प्रदर्शित ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातून केली होती. यामध्ये प्रियासोबत अरशदा वारसी आणि चंद्रचूर सिंग हे अभिनेता होते. मात्र, अभिनेत्रीच्या सुरुवातीचा चित्रपट बॉक्सऑफिसवर जोरदार आपटला.

प्रियाची सुरुवात भले चांगली नसली झाली तरी तिच्या सुंदरतेने चाहत्यांवर भुरळ घातली होती ज्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक झाले होते. याचमुळे प्रियाला ‘सिर्फ तुम’ हा चित्रपट मिळाला होता. हा चित्रपट (1999) साली चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घातला होता. ज्यामुळे अभिनेत्री जभरात प्रसिद्ध झाली. यामध्ये प्रियासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) होते. या चित्रपटानंतर अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली ज्यामुळे प्रियाला शाहरुख खान (Shaharukh Khan) सोबत (2000) साली ‘जोश’ मध्ये तर (2002 ) साली ‘रेड’ चित्रपटात पाहायला मिळाली. यानंतर अभिनेत्रीच्या सुंदरतेची तुलना ऐश्वर्या रॉय बच्चन  (Aishwarya Rai Bacchan) सोबत होऊ लागली. मात्र, अभिनेत्रीच्या चित्रपटांना बॉक्सऑफिसवर फार काही यश मिळत नव्हते.

अनेक प्रयत्नानंतर प्रियाने (2006) साली बॉलिवूडला कायमचा राम राम ठोकला आणि साउथ इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावलं त्यावेळी तिने साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती. मात्र, तिथेही प्रियाला यश लाभलं नाही आणि शेवटी तिने अभिनय क्षेत्रापासूनच लांब जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या 17 वर्षापसून प्रिया मोठ्या पडद्यापासून लांब आहे. माध्यमातील वृत्तानुसार असेही म्हटले जात आहे की, प्रिया आता भारतापासून लांब डेणमार्कमध्ये स्थायी झाली असून आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खरे की काय! सलमान खानच्या सिनेमातून शिव ठाकरे करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
राखीने आदिलवर लावला अजून एक गंभीर आरोप; म्हणाली, ‘मी नमाज वाचत असताना मला लाथेने…’

हे देखील वाचा