करण जोहर हा एक लोकप्रिय चित्रपट निर्माता आहे. त्याने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट निर्माण केले. आणि त्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य ही केले आहे. तर आता सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे करण जोहरने शाहरुख खान, आलिया भट्ट, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना त्याने अनफॉलो केल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. तर असे का केले अशी शंका, प्रश्न चाहत्याची मनात होती. पण आता या गोष्टीना पुर्णविराम मिळाला आहे. कारण करण जोहरने या गोष्टीमागील कहाणी स्पष्ट केले आहेत.
करण (karan)जोहर या बॉलिवूड सेलिब्रिटींना त्याने अनफॉलो केल्याचे गोष्टीवर करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली, ज्यात त्याने स्पष्ट केले की हा निर्णय “डिजिटल डिटॉक्स”चा एक भाग होता. “याचा माझ्या मित्रांशी आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांशी असलेल्या कोणत्याही मतभेदांशी काहीही संबंध नाही,” असे त्याने लिहिले. “हा एक डिजिटल डिटॉक्स आहे. इंस्टाग्रामवरील माझा वेळ वाचवण्यासाठी मी हे करत आहे. असे करण जोहरने म्हणले आहे.
या चित्रपट निर्मात्याचे इंस्टाग्रामवर 17.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि तो फक्त 78 अकाऊंट्सना फॉलो करतो. करण जोहरचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट, “चांद मेरा दिल,” बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्याच्या पुढील निर्मिती असलेल्या “नागझिला” या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










