बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Suddiqui)सध्या त्याच्या ‘तुम्बाड २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नवाझुद्दीनने आज ईदच्या निमित्ताने ‘तुम्बाड २’ च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. नवाझुद्दीन या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे.
नवाझुद्दीन सिद्दिकीने खुलासा केला आहे की, यावर्षी तो ईद काम करत घालवणार आहे. तो ‘तुम्बाद २’ या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. त्याने सांगितले की, त्याची भूमिका खूप वेगळी असून, चित्रपटात जीवनाच्या अनेक विविध छटा दाखवल्या जातील.
‘तुम्बाड’चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. या हॉरर चित्रपटात सोहम शाहने मुख्य भूमिका साकारली होती. महाराष्ट्रातील ‘तुम्बाड’ नावाच्या गावातील एक गुप्त खजिना आणि मानवी लोभाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता.
‘तुम्बाड’ चित्रपटाचा दुसरा भाग ३ डिसेंबर २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याची घोषणा करण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शन आदेश प्रसाद करत आहेत. सोहम शाह फिल्म्स आणि पेन स्टुडिओ संयुक्तपणे याची निर्मिती करत आहेत.
नवाझुद्दीनने ‘सरफरोश’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारख्या चित्रपटांमधील छोट्या भूमिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’मुळे त्याला ओळख मिळाली. तेव्हापासून त्याने ‘बजरंग भाईजान’, ‘किक’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो आता ‘तुम्बाड २’ मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










