Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड सोहेल खानसोबत घटस्फोटावर सीमाचं वक्तव्य; म्हणाली, ‘मी त्याबद्दल कधीही माफी मागणार नाही’

सोहेल खानसोबत घटस्फोटावर सीमाचं वक्तव्य; म्हणाली, ‘मी त्याबद्दल कधीही माफी मागणार नाही’

बॉलिवूड अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा सचदेव (Seema Sachdeva) यांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाला २४ वर्षे पूर्ण होत आहेत आणि ते आज म्हणजेच शुक्रवारी ते दोघे फॅमिली कोर्टातून बाहेर पडताना दिसले. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केले नाही. पण हे देखील खरे आहे की, सोहेल आणि सीमा बऱ्याच काळापासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सीमाने यापूर्वी सोहेल खानपासून वेगळे होण्यावर संभाषण केलं आहे.

खरं तर, नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलीवूड वाइव्ह्ज’मध्ये सोहेल खान आणि सीमा खान यांची मुले त्यांच्या आई-वडिलांच्या घरांमध्ये फिरताना दिसली होती. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्येच सीमाने वेगवेगळ्या घरात राहण्याबद्दल सांगितले होते. यादरम्यान सीमा तिचा पती सोहेल खानबद्दलही मोकळेपणाने बोलली आणि सांगितले की, ती नेहमीच त्याच्यावर प्रेम करत राहिल. (sohail seema khan divorce when seema khan said for the first time about separated from him)

सीमा खानने पुढे सांगितले की, सोहेल खानचे कुटुंब खूप चांगले आहे आणि तो एक चांगला पिता आहे. सीमा म्हणाली, “मी त्याच्यावर कायम प्रेम करेन. आमचे संबंध चांगले आहेत. कधी कधी तुम्ही मोठे होताना, तुमचे नाते वेगवेगळ्या दिशेने जाते. मी त्याबद्दल कधीही माफी मागणार नाही, कारण आम्ही आनंदी आहोत आणि आमची मुलेही आनंदी आहेत.”

ती पुढे म्हणाली की, ती आणि सोहेल हे एका पारंपारिक लग्नात नाहीत, पण तरीही ते एक कुटुंब आहेत. सीमा म्हणाली, “आम्ही एक युनिट आहोत. आमच्यासाठी तो, मी आणि आमची मुले शेवटपर्यंत महत्त्वाची आहेत.” ती खूप लहान असताना सोहेलला भेटल्याचेही तिने सांगितले.

सोहेल खान आणि सीमा खान यांचा प्रेमविवाह झाला होता. सोहेल खान ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना सीमाला पहिल्यांदा भेटला होता. त्यांचे नाते त्यांच्या कुटुंबाने स्वीकारण्यास नकार दिला आणि म्हणूनच त्यांनी १९९८ मध्ये त्यांच्या मित्रांच्या मदतीने गुपचूप लग्न केले. त्यांना निर्वाण आणि योहान अशी दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा