Friday, May 24, 2024

टीम इंडियाला आख्ख्या जगाने दिल्या शुभेच्छा, पण ‘या’ मराठी कलाकारांच्या वक्तव्याने वेधले लक्ष

इंडिया! इंडिया! हा गजर ऐकला की मॅच चालू आहे, असं समजून जायचं. जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यात आज उत्साहाची चमक दिसून येत आहे. कारण आज 2023 क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ तयार आहे आणि आपला चौथा विश्वचषक जिंकण्याची तयारी करत आहे. या निमित्ताने काही कलाकारांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या कलाकारांनी आपले क्रिकेट प्रेम व्यक्त करत जुन्या आठवणीही सांगितल्या आहेत.

भारतीय संघाने आतापर्यंत तीन क्रिकेट विश्वचषक (world cup 2023) जिंकले आहेत. यावेळी भारत चौथा विश्वचषक जिंकण्याची तयारी करत आहे. भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी प्रवेश मिळवला आहे.

‘सारं काही तिच्यासाठीची’ उमा म्हणजेच खुशबू तावडे हिने आठवणी शेअर करताना सांगितले की, “मी शाळेत महिला क्रिकेट संघाचा भाग होते आणि राज्य स्तरावर क्रिकेट खेळले आहे. बॅटिंगपेक्षा बॉलिंग करण्यामध्ये मला जास्त मजा यायची. पण मग दहावीतला अभ्यास आणि तितकस मार्गदर्शन न मिळाल्यामुळे माझं क्रिकेट खेळणं सुटलं. क्रिकेट लहानपणापासून माझ्यासाठी खूप जवळचा विषय राहिला आहे. भारतीय टीमला विश्वचषक मध्ये खेळताना बघायची नेहमीच उत्सुकता असते.”

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे म्हणाली की, “क्रिकेट आणि माझं नातं अतूट आहे. मला कुठेही एक फळी जरी मिळाली तरीही मी क्रिकेट खेळायला सुरु करते. मी साधारण 8 वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि 12वी ला जाईपर्यंत मी क्रिकेट खेळात होते. मी राष्ट्रीय स्तरावर ही क्रिकेट खेळली आहे. या वेळी सेटवर विश्वचषक पाहण्याचा आनंदच वेगळा असणार आहे.”

‘सारं काही तिच्यासाठी’ची दक्षता जोईल म्हणजेच निशिगंधाने सांगितले की, “अभिमान आहे मला आपल्या भारतीय संघाचा ज्या प्रकारे त्यांनी विश्वचषकची प्रत्येक मॅच गाजवली आहे. 19 नोव्हेंबरच्या अंतिम मॅचची जिज्ञासा अजून वाढली आहे. माझं क्रिकेटच नातं तेवढं दाट नसलं तरीही लहानपणी मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याची आठवण माझ्या मनात अजूनही आहे.”

रुची कदम म्हणजेच ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली ओवीया यावर बोलताना म्हणाली की, “क्रिकेटची माझी आवडती आठवण म्हणजे बाबांसोबत क्रिकेटचे महारथी सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेला खेळताना पाहिलेला क्षण. मी खूप लहान होती मला तितकस आठवत नाही पण मला लक्षात आहे बाबा ज्या विद्यालयात शिक्षक होते तिथे हे दोघे खेळायला आले होते. आम्ही सर्व त्यांना खेळताना बघायला गेलो होतो. मला क्रिकेटची जितकी माहिती आहे ती माझ्या बाबांमुळे.”

‘सारं काही तिच्यासाठी’ मधील अभिषेक गावकर म्हणाला की, “मी चाळीत लहानपणापासून राहल्यामुळे गल्ली क्रिकेट रोज खेळायचो आणि माझ्या घरी क्रिकेटच छोटं किट असायचं. मी ऑल राऊंडर होतो आणि आता ही जेव्हा सेलिब्रिटी क्रिकेट मॅच होतात तेव्हा मी वेळ काढून खेळायला जातो. मला इतकं क्रिकेटच वेड आहे की, मी वरळीला राहत असल्यामुळे वानखडे स्टेडियममध्ये खूप वेळा भारताची मॅच पाहायला जायचो. आज मी जर कलाकार नसतो आज तर नक्कीच क्रिकेटर असतो. भारतीय संघाने विश्व चषकाच्या प्रत्येक टप्यावर आतापर्यंत जे यश मिळवलं आहे. मला विश्वास आहे वर्ल्ड कप ही भारतच घरी आणणार.”

या कलाकारांनी सर्वांनीच भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांनी विश्वचषक जिंकण्याची खात्री व्यक्त केली आहे. भारतीय संघाला या शुभेच्छांमुळे नक्कीच प्रेरणा मिळेल आणि ते विश्वचषक जिंकण्यास यशस्वी होतील अशी आशा आहे. (Some actors of Zee Marathi posted on social media and wished Team India world cup 2023)

आधिक वाचा-
अपारशक्तीने मध्यरात्री केले होते आकृतीला प्रपोज, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी
शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे -अमृता देशमुखचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, पाहा फोटो

हे देखील वाचा