Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड नाव न घेता सोमी अलीने सोशल मीडियावर साधला सलमान खानवर निशाणा, पुन्हा आली सोमी-सल्लूची जोडी चर्चेत

नाव न घेता सोमी अलीने सोशल मीडियावर साधला सलमान खानवर निशाणा, पुन्हा आली सोमी-सल्लूची जोडी चर्चेत

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांइतकाच कथित प्रेम प्रकरणामुळेही नेहमीच चर्चेत असतो. ऐश्वर्या राय(Aishwarya Rai), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) कॅटरिना कैफ (katrina Kaif) अशा अनेक अभिनेत्रींसोबत भाईजानचे नाव जोडले गेले आहे. मात्र ऐश्वर्या रायच्या आधी सोमी अली(Somy Ali) आणि सलमान खान यांच्या प्रेमप्रकरणाची सर्वात जास्त चर्चा रंगली होती. यावेळी सोमी अली सलमानच्या प्रेमात पुरती बुडाली होती. दोघे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती, मात्र अचानक त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि सोमीने देश सोडण्याचा निर्णय घेतला. आता पून्हा एकदा सोमी एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

सध्या सोमी अलीची एक पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे, ज्यामध्ये तिने अभिनेता सलमान खानच्या एका चित्रपटाचा पोस्टर शेअर करत एक लक्षवेधक पोस्ट केली आहे. त्यामुळेच सोमी अली हे नाव पून्हा एकदा उजेडात आले आहे. सोमी अली ही पाकिस्तानमध्ये राहत होती. तिची आई इराणी तर पिता पाकिस्तानी होते. सोमीचे सगळे बालपण पाकिस्तानमध्ये गेले. लहानपणापासूनच तिला बॉलिवूडच्या दुनियेचे प्रचंड आकर्षण होते. त्यामुळे सोमीने वयाच्या १६ व्या वर्षी स्वप्ननगरी मुंबईत पाऊल ठेवले. इथे तिची आणि सलमान खानची घट्ट मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनीही समजले नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान आणि सोमी अली तब्बल सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याची अनेक कारणे सांगितली जातात. सलमान खानचा रागीट स्वभावामुळे सोमीने ब्रेकअप केल्याचीही चर्चा रंगली होती. काही जणांनी सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या राय आल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचेही सांगितले गेले. या काळात सोमीने आठ चित्रपटात काम केले. मात्र तिच्या अभिनयाची छाप तिला पाडता आली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा