सोनाली कुलकर्णी ही चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. २०२१ मध्ये एका पाठोपाठ एका जबरदस्त चित्रपटात काम करून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करत असते. ती तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबत देखील व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचा भाऊ अतुल कुलकर्णीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सोनालीने (sonalee kulkarni) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती तिच्या भावासोबत डान्स करत आहे. ते दोघेही ‘डान्स मेरी राणी’ गाण्यावर डान्स करत आहे. त्या दोघांचा जबरदस्त डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (sonalee kulkarni share dance video with her brother)
हा डान्स व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “पहिल्यांदा भावासोबत ट्रेंडिंग रील.” त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यांचे अनेक चाहते तसेच कलाकार त्यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर अमेय वाघने कमेंट केली आहे की, “मला अतुलचा डान्स जास्त आवडला.” तसेच कुशल बद्रिकेने कमेंट केली आहे की, “खूप भारी,” अशी कमेंट केली आहे. यावर सोनालीने “थँक यू मित्रा,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते देखील या पोस्टवर कमेंट करत आहेत.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.
यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतेच तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच ती ‘पांडू’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसली आहे. तसेच ती ‘व्हिकटोरीया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.
हेही वाचा :