Thursday, April 25, 2024

मोठी बातमी! अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव; बोलला हृदयस्पर्शी गोष्ट

‘बचपन का प्यार’ या गाण्याने सर्वांना वेड लावणाऱ्या सहदेव दिरदोचा मागील काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन, डोक्याला टाकेही पडले होते. मात्र, आता त्याच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सहदेव पूर्णपणे बरा झाला आहे.

अपघातानंतर सहदेव प्रथमच आला जगासमोर
अपघातानंतर सहदेव (Sahdev Dirdo) प्रथमच समोर आला आहे. त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून सहदेवने आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या रिकव्हरीची माहितीही दिली आहे.

या व्हिडिओमध्ये सहदेव हात जोडून डॉक्टर आणि चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे. तो म्हणाला की, आता तो पूर्णपणे बरा आहे. सहदेवने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ”प्रार्थना केल्याबद्दल आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.” त्याने डॉ. देवेंद्र नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

सहदेव हे त्याच्या शाळेत ‘बचपन का प्यार’ गाणे गाऊन प्रसिद्ध झाला होता. यानंतर बॉलिवूड गायक बादशाहने त्याच्यासोबत एक गाणे तयार केले होते. त्या गाण्यालाही चांगलीच पसंती मिळाली होती. जेव्हा त्याचा अपघात झाला, तेव्हा सहदेवला पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक (SP) आणि जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहोचले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना चांगले उपचार करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर त्याला जगदलपूरला रेफर करण्यात आले.

सहदेवने ‘बचपन का प्यार’ हे गाणे छत्तीसगडच्या एका छोट्या गावात त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात गायले होते. त्याच्या शिक्षकांनी हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले होते. काही महिन्यांनंतर हे गाणे व्हायरल झाले आणि चाहत्यांच्या ओठांवर गुणगुणू लागले. सहदेवला ‘इंडियन आयडल १२’मध्ये पाहुणा म्हणूनही बोलावण्यात आले होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा