Thursday, March 28, 2024

बीचवर काळ्या साडीत दिसली प्रिया प्रकाश वारियर, व्हिडिओने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. याप्रमाणे विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियर देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रिया प्रकाशला देखील तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे आवडते. ती तिच्या स्टाईलमुळे देखील नेहमीच चर्चेचा विषय बनते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. अलिकडेच, अभिनेत्रीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समुद्रकिनारी दाखवली दिलफेक अदा

या व्हिडिओमध्ये प्रिया (Priya Prakash Varrier) समुद्रकिनारी तिच्या किलर लूकची जादू दाखवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा केवळ लूकच चाहत्यांची झोप उडवत नाही, तर तिची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावत आहे.

काळ्या साडीत दिसली अभिनेत्री

लूकबद्दल बोलायचे झाले, तर व्हिडिओमध्ये प्रियाने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने हलक्या मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत. ज्यामध्ये ती बीचवर फिरताना दिसत आहे. कधी ती समुद्रकिनारी धावताना, तर कधी साडीचा पदर हलवताना, तर कधी समुद्राच्या लाटांशी मस्ती करताना दिसली.

स्वत: शेअर केला व्हिडिओ

स्वत: अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सूर्यास्त आणि वाळू…”

चाहते करत आहेत कमेंट

चाहत्यांनाही अभिनेत्रीचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “हिची तुलना नाही.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “तू खूप क्यूट आहेस.” तर तिसऱ्या युजरने लिहिले की, “या व्हिडिओने माझा दिवस बनवला.” याशिवाय इतर अनेक चाहते देखील अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. कमेंट करत चाहते हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

‘ओरु अदार लव्ह’च्या ट्रेलरनंतर आली चर्चेत

प्रिया २०१९ मध्ये तिच्या ‘ओरू अदार लव्ह’ चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. ट्रेलरच्या एका सीनमध्ये अभिनेत्रीने तिला डोळा मारून सर्वांना वेड लावले. त्यानंतर ती राष्ट्रीय क्रश म्हणून ओळखू जाऊ लागली.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा