अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ पार्टनर बनला ‘सीरियल किसर’ इमरान हाश्मी, आगामी सिनेमाचा टिझर घालतोय धुमाकूळ

अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला नवीन चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय आणि इमरानने आपापल्या अधिकृत सोशल मीडिया अकांऊटवरून ‘सेल्फी’चा टिझर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. याआधी दोघांनी चित्रपटाचा पोस्टर आणि आपला लूक दाखवला होता.

अक्षय (Akshay Kumar) आणि इमरानने (Emraan Hashmi) इंस्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘सेल्फी’ आहे. त्याप्रमाणेच अक्षय आणि इमरानच्या सेल्फीचा टिझरही खूपच शानदार वाटत आहे.

‘सेल्फीच्या’ ४९ सेकंदाच्या टिझरची सुरुवात अक्षय कुमारपासून होते. ज्यामध्ये तो एका मोठ्या बस डेपोमध्ये ऊभा राहून तो प्लेबोर्ड वाजवताना दिसत आहे. त्याच्या पाठीमागे काही लोक डान्स करत आहेत. त्याचवेळी चित्रपटात इमरान हाश्मीची एन्ट्री होते आणि तो अक्षय कुमारला सेल्फीसाठी विचारतो. मात्र, तो नकार दतो. यानंतर दोघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये दोघांच्या भन्नाट आणि मजेशीर डान्स मूव्हज पाहायला मिळत आहे.

अक्षयने हा टिझर शेअर करत लिहिले आहे की, “सादर आहे ‘सेल्फी’ एक प्रवास, जो तुम्हाला भरपूर मनोरंजन, हसू आणि भावनिकतेकडे घेऊन जाईल. यासोबतच शूटिंग लवकरच सुरू होईल.” अभिनेता इमरान हाश्मीनेही हा टिझर शेअर करत “अक्षय कुमारसोबत ड्रायव्हिंग सीट शेअर करताना खूपच गर्व आणि सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. तयार राहा, कारण सेल्फी लवकरच तुमच्याजवळ येणार आहे. ज्याला राज मेहता दिग्दर्शित करत आहेत, शूटिंग लवकरच सुरु होईल,” असे कॅप्शन लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

याआधी अक्षय कुमारने चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले होते, ज्यामधून त्याने आपले लूक दाखवले होते. सर्वप्रथम एक सेल्फी घेत अक्षय कुमारने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने निळ्या डेनिम जीन्ससोबत पिवळ्या रंगाच जॅकेट घातले आहे. हा फोटो शेअर करत “माझ्या दिवसाची सुरुवात सेल्फीसोबत,” असे कॅप्शन लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने इमरान हाश्मीसोबतचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो गाडीवर बसला आहे, आणि दुसऱ्या गाडीवर इमरान हाश्मी बसलेला दिसत आहे. हा पोस्टर शेअर करत अक्षयने “मी स्वतःच माझा योग्य सेल्फी पार्टनर निवडला आहे,” असे कॅप्शन लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

राज मेहता दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. याआधी राज मेहता यांनी अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या ‘गुडन्यूज’ चित्रपटाच दिग्दर्शन केल आहे.

हा बहुचर्चित चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘ड्रायव्हिंग लायसेंस’ या विनोदी मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यामध्ये पृथ्वीराज सुकुमारन एका सुपरस्टारच्या आणि सूरज वेंजारामूडु एका वाहन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून आले होते.

हेही वाचा-

Latest Post