बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. मॉडेलिंग ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सोनाली नुकतीच 47 वर्षाची झाली. सोनालीसाठी नवीन वर्ष नेहमीच खास असते. एक तर संपूर्ण जग नवीन वर्षाचे धमाकेदार स्वागत करत असते आणि सोनाली या स्वागतासोबत तिचा वाढदिवसही साजरा करते.
सोनालीने तिच्या 47 वर्षाच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. सोनालीने गोल्डी बहलसोबत 2002 मध्ये लग्न केले. मात्र, त्याआधी सोनालीचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले होते. कोणी तिला किडनॅप करण्याची धमकी दिली तर कोणी तिला घर तोडण्यासाठी जबाबदार धरले.
राज ठाकरे सोनालीसोबत लग्न करू इच्छित होते?
असं बोललं जात होतं की, राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकेकाळी खूप जवळ आले होते. दोघं एकमेकांना पसंत करत होते. जेव्हा सोनाली आणि राज ठाकरेसोबत आले तेव्हा राज ठाकरे अगोदरच विवाहित होते. तरीही त्यांना सोनालीसोबत लग्न करायचे होते, अशी तेव्हा चर्चा होत होती.
सोनाली आणि राज यांच्याबद्दल जेव्हा शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांना समजले, तेव्हा मात्र त्यांनी या नात्याला जोरदार विरोध करत नाते संपवायला सांगितले. त्यानंतर या दोघांच्या नात्यात अंतर निर्माण झाले.
शोएब अख्तरने दिली होती किडनॅप करण्याची धमकी!
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर जेव्हा पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला तेव्हा तो सोनालीला पहिल्यांदा भेटला होता. आणि पहिल्याच भेटीत शोएब सोनालीच्या प्रेमात पडला होता. त्याआधी देखील त्याने सोनालीचे चित्रपट पाहिले होते.
सोनालीचा इंग्लिश बाबू देसी मेम सिनेमा पहिल्यापासून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. तिला भेटल्यावर तर तो तिच्या अधिकच प्रेमात पडला. तो त्याच्या पाकिटात सोनालीचा फोटो घेऊन फिरायचा.
एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, जर सोनालीने त्याचे प्रपोजल स्वीकारले नाही तर तो तिला किडनॅप करून घेऊन जाईल. त्यावर सोनालीला विचारल्यावर ती म्हणाली की, “मला क्रिकेटमध्ये बिलकुल रस नाही त्यामुळे मी क्रिकेट बघत नाही. पण मी त्यांच्या भावनांचा आदर करते. त्यांना खुप धन्यवाद देते की माझ्यावर एवढे प्रेम करण्याबद्दल.”
सुनील शेट्टीचे घर तोडायचा झाला होता आरोप…
सोनाली आणि सुनीलने 90च्या दशकात अनेक सिनेमात काम केले. त्यामुळे त्यांच्या जवळीक वाढली. त्यांच्यातल्या नात्याच्या बातम्या मीडियामध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये खूप गाजत असतांना, सुनीलच्या घरी याबद्दल समजले. त्याच्या घरच्यांनी सोनालीसोबत बोलणे बंद केले.
त्यांमुळे सोनालीवर सुनीलचे घर तोडण्याचे अनेक आरोप केले गेले. यानंतर सोनालीने एका मुलाखतीत सांगितले की, ‘या चुकीच्या बातम्यांमुळे माझ्या आणि सुनीलच्या मैत्रीमध्ये अंतर निर्माण झाले. आमच्या नात्याबद्दल येणाऱ्या बातम्या खोट्या आहे, अशा खोट्या बातम्यांवर स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटत नाही.’
पाहताच क्षणी गोल्डी पडले सोनालीच्या प्रेमात…
निर्माते गोल्डी बहल यांची आणि सोनालीची पहिली भेट ‘नाराज’ चित्रपटाच्या सेटवर झाली. सोनालीला पाहतच गोल्डी तिच्या प्रेमात पडले होते. गोल्डी यांची बहीण सृष्टी आर्या आणि सोनाली मैत्रीणी होत्या, तिनेच सोनाली आणि गोल्डी यांची पहिली भेट घडवून आणली. हे तिघं जेवत असतांना गोल्डीने सोनालीच्या जेवणावर एक कमेंट केली, त्यावर सोनाली थोडी नाराज झाली होती. तरी देखील हे दोघं थोडा वेळ एकमेकांशी गप्पा मारत होते.
अभिषेक बच्चनच्या सांगण्यावरून गोल्डीने केले सोनालीला प्रपोज…
गोल्डी आणि अभिषेक बच्चन चांगले मित्र आहेत. सोनाली एकदा मेजर साहब सिनेमाचे शूटिंग करत होती. तेव्हा अभिषेक आणि गोल्डी नेहमी सेटवर यायचे. यानिमित्ताने सोनाली, गोल्डी आणि अभिषेक एकत्र वेळ घालू लागले. सोनालीचा ‘अंगारे’ ह्या सिनेमाचे निर्माते गोल्डी असल्याने त्यांना सोनालीसोबत वेळ घालवायला चांगली संधी मिळाली होती.
एकदिवस सेटवर पार्टी चालू असतांना, अभिषेकने गोल्डीला सोनालीला प्रपोज करायला जबरदस्ती केली, तेव्हा गोल्डी यांनी त्याच्या भावना सोनालीसमोर व्य्क केल्या आणि सोनालीने देखील त्यांना होकार दिला. पुढे नोव्हेंबर 2002 मध्ये या दोघांनी लग्न केले.(sonali bendre pakistani cricketers shoaib akhtarwants to kidnap sonali bendre ofr one sided love sunil shetty and raj thackeray also were madly in love with her)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘त्यावेळी दिग्दर्शकही अंडरवर्ल्डच्या दबावाखाली होते…’ अभिनेत्री सोनाली बेंद्रेने केला धक्कादायक खुलासा
Birthday Special: सुनील शेट्टीला केलं होतं प्रपोज, पण ‘या’ दिग्दर्शकासोबत थाटला सोनाली बेंद्रेने संसार