Sunday, April 14, 2024

‘त्यावेळी दिग्दर्शकही अंडरवर्ल्डच्या दबावाखाली होते…’ अभिनेत्री सोनाली बेंद्रेने केला धक्कादायक खुलासा

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर अंडरवर्ल्डचे वर्चस्व होते. चित्रपटांवर अंडरवर्ल्डचा पैसा वापरला गेला. निर्माते, दिग्दर्शकांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी अंडरवर्ल्डच्या दबावाखाली काम केले, मात्र काळ बदलला तशी ही काळी छायाही इंडस्ट्रीपासून दूर गेली. त्यावेळी काही कलाकारांनीही याविरोधात आवाज उठवला होता, तर आज इतक्या वर्षांनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) याबाबत उघडपणे बोलली आहे. काय म्हणाली सोनाली बेंद्रे चला जाणून घेऊ.

सोनाली बेंद्रे ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनाली अलीकडेच रणवीर शो पॉडकास्टमध्ये पोहोचली जिथे अभिनेत्रीने कबूल केले की 90 च्या दशकात, दिग्दर्शकांवर अंडरवर्ल्डचा दबाव होता, ज्यामुळे अभिनेत्रीला अनेक चित्रपटांसाठी नकार देण्यात आला होता. अभिनेत्रीने सांगितले की, दिग्दर्शक स्पष्टपणे सांगायचा की आता तो काहीही करू शकत नाही.

याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली की, “अनेक ठिकाणांहून चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले जात होते. बेकायदेशीरपणे पैसे येत होते, साहजिकच बँका तुम्हाला तेवढे पैसे देणार नाहीत, त्यांनाही मर्यादा होती. माझ्याबद्दल सांगायचे तर, जिथे मला काहीतरी चुकीचे आहे असे वाटायचे, तिथे मी साउथमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे, मी ते करू शकत नाही, असा बहाणा करायचे. ती नेहमी स्वत:ला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते आणि यामध्ये तिचा बॉयफ्रेंड गोल्डी बहलने खूप मदत केली. गोल्डीला चांगल्या आणि वाईट फिल्म फायनान्सर्सची चांगली समज होती. कारण त्यांचे कुटुंब या व्यवसायाशी निगडीत होते.”

अंडरवर्ल्डच्या दबावामुळे अनेक भूमिका तिच्या हातून गेल्याचा खुलासाही सोनालीने केला. अभिनेत्री म्हणाली की, “कधीकधी असं व्हायचं की मला ज्या भूमिका करायच्या होत्या त्या नंतर दुसऱ्याला सोपवल्या जायच्या. कारण निर्मात्यांना कुठूनतरी फोन यायचे. त्यावेळी दिग्दर्शक आणि सहकलाकार तुम्हाला फोन करतात आणि म्हणतात की ‘आम्ही समजतो, पण आमच्यावर दबाव आहे, आम्ही काहीही करू शकत नाही.”सोनाली बेंद्रे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द ब्रोकन न्यूज या सिरीजमध्ये दिसली आहे.(sonali bendre reveals film industry and director were in pressure of underworld)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असलेल्या संजय दत्त आणि नाना पाटेकर यांनी आजपर्यंत का केले नाही सोबत काम

‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी

हे देखील वाचा