Tuesday, June 25, 2024

सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावर चाहते फिदा; म्हणाले, ‘भारतीय संस्कृती जपताना पाहूण…’

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ती सतत चर्चेत असते. या वर्षी तिच्या अनेक चित्रपटांनी चांंगलाच धुमाकूळ घातला आहे. तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सोनाली नुकतेच दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली आहे. तिने कुणाल बेनोडेकरसोबतच लग्न केले आहे. मागील वर्षी लॉक डाऊनमध्ये अगदी साध्या पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला.

सोनाली (sonalee kulkarni) सध्या तुर्कीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सोनाली तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. यावर युजरने अनेक प्रश्न सरबत सुरुवात केली आहे. सोनाली सध्या अनेक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकवत आहे. काही नेटकऱ्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. तर काही मात्र तिला ट्रोल करत आहेत.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहीले की, “‘बलून कॅपाडोसिया’ फोटोशूटसाठी खूप लोकप्रिय आहे, जगभरातून लोक इथे येतात. मॉडेल्स, नववधू, त्यांच्या शूटसाठी, विंटेज कार आणि फ्लोइंग गाउन भाड्याने घेतात. मी पण या निसर्गरम्य ठिकाणाला भेट दिली आहे. मी आपली भारतीय संस्कृतिचे प्रतिनिधित्व करत साडी घालून फोटो काढले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

तिच्या या पोस्टवर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत. एकाने म्हटले की, खूपच सुंदर. दुसऱ्याने लिहील की, “फोटोशूट खूपच सुंदर आहे आणि तुला साडी नेसून भारतीय संस्कृती जपताना पाहूण खूप आनंद होत आहे…” सोनालीने या वर्षी अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांमध्ये आणखी प्रसिद्धी मिळवली आहे. तिने ‘पांडू’,(pandu) ‘झिम्मा’ (jhimma),’तमाशा लाईव्ह’, ‘व्हीकटोरीया’ या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. (Fida on Sonalee Kulkarni’s beauty)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ भोजपूरी गायिकेला भर कार्यक्रमात घातली गोळी, घटनेने सर्वत्र खळबळ!
लग्न कधी आहे? असा प्रश्न विचारताच परिणीती चोप्राने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा