Monday, January 19, 2026
Home मराठी सोनाली पाटीलने केला ‘सामी सामी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, रश्मिका मंदानाच्या स्टेप्स केल्या फॉलो

सोनाली पाटीलने केला ‘सामी सामी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, रश्मिका मंदानाच्या स्टेप्स केल्या फॉलो

बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वातील सगळेच स्पर्धक गाजले. प्रत्येकाने त्याच्या विशिष्ट अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात एक महत्वाचे स्थान निर्माण केले. अशातच घरातील स्पर्धक सोनाली पाटील ही देखील चांगलीच लोकप्रिय झाली. तिने तिच्या विनोदी स्वभावाने आणि बडबड्या वृत्तीने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले. दोन आठवड्यापूर्वी ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.

तेव्हापासून ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले झाला आहे. यावेळी विशाल निकम विजेता झाला आहे. अशातच सोनाली पाटील ने तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. (sonali patil share her dance video on sami sami song)

सोनालीने (sonali patil) ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स केला आहे.या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने रश्मिका मंदानाच्या डान्स स्टेप्स फॉलो करत आहेत. तिचा हा डान्स व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

बिग बॉसच्या घरात असताना सोनाली खूप चर्चेत आली होती. तिची आणि मीनल शाहूची मैत्री देखील सगळ्यांना खूप आवडली होती. त्यांना सगळ्यांना सोना-मोना ही नावे दिली होती. नुकतेच मिनलने सोनालीची तिच्या जाणून भेट घेतली आहे. त्यामुळे सोनालीने तिचे औक्षण करून तिचे स्वागत केले.

सोनालीने ‘वैजू नंबर १’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आणि तिने बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला. तिने तब्बल ९० दिवसाचा प्रवास घरात पूर्ण केला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा