मुलगी लहान असो किंवा मोठी, जर ती काही काळानंतर आपल्या वडिलांना भेटली, तर तिला गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. याला बॉलिवूड अभिनेत्रीही अपवाद नाहीत. असेच काहीसे झालंय, ते अभिनेत्री सोनम कपूरबाबत. सोनम जवळपास १ वर्षानंतर भारतात परतली आहे. कुटुंबाला भेटण्यासाठी आतुर असलेली सोनम आपले वडील आणि दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांना विमानतळावर पाहून भावुक झाली.
सोनम मंगळवारी (१३ जुलै) लंडनहून मुंबईला परतली आहे. मुलीच्या येण्याच्या आनंदात वडील अनिल कपूर स्वत: विमानतळावर तिला घेण्यासाठी पोहोचले होते. सोनमचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत. यामध्ये दिसते की, ती आपल्या वडिलांना पाहून खूपच भावुक झालीय. (Sonam Kapoor Breaks Down After See Dad Anil Kapoor At Airport After A Year)
सोनम जशी विमानतळावरून बाहेर पडली, तेव्हा तिने पाहिले की, वडील अनिल कपूर तिला घेण्यासाठी पोहोचले आहेत. हे पाहून ती स्वत:ला थांबवू शकली नाही आणि बाबा…बाबा… म्हणू लागली. ती आपल्या वडिलांच्या जवळ येताच भावुक झाली आणि गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. सोनम आणि अनिल कपूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
सोनमचा हा व्हिडिओ प्रसिद्ध पॅपराजी व्हायरल भयानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोनम यादरम्यान स्कर्ट टाईप राखाडी आणि निळ्या रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसली. तसेच तिच्यासोबत निळ्या आणि लाल रंगाचे जॅकेटही होते.
सोनमचे चाहते तिला पाहून खुश आहेत, तर दुसरीकडे काहीजण ती प्रेग्नंट असल्याचा अंदाजही लावत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “सोनम प्रेग्नंट आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “सोनम प्रेग्नंट दिसत आहे.”
सोनम मागील काही महिन्यांपासून पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहत होती. यामागील कारण म्हणजे कोरोना व्हायरल आणि तिच्या पतीचा व्यावसाय होता. ती सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट शेअर करून सांगते की, तिला आपले घर, कुटुंब आणि भारताची खूप आठवण येत आहे.
सोनमने सन २००७ मध्ये आलेल्या ‘सांवरिया’ चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दुःखद: प्रसिद्ध सुफी गायक मनमीत सिंग याचा नाल्यात बुडून मृत्यू; मृतदेह पोलिसांच्या ताब्यात