Sunday, October 6, 2024
Home बॉलीवूड याद आ रही है! सोनम कपूर करतेय पतीला मिस, व्हिडिओ कॉलवर मानावं लागतंय समाधान

याद आ रही है! सोनम कपूर करतेय पतीला मिस, व्हिडिओ कॉलवर मानावं लागतंय समाधान

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच मुंबई येथील तिच्या घरी परत आली होती. मागील काही दिवसांपूर्वीच सोनमची बहीण रियाचे लग्न झाले आहे. या लग्नाला सोनमचा पती आनंद आहुजा देखील उपस्थित होता. परंतु घरी परत आल्यानंतर सोनमला आता पतीची खूप आठवण येत आहे. अलीकडेच सोनमने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यात ती पतीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत होती. अशातच तिने एक फोटो केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

सोनम करतीय पतीला मिस
अभिनेत्री सोनम कपूर गेले एक वर्ष पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहत होती, तर ती नुकतीच तिची बहीण रिया कपूरच्या लग्नासाठी मुंबईला पोहोचली होती. सोनमची बहीण रिया कपूरचे लग्न १४ ऑगस्ट रोजी झाले आहे. या लग्नात सोनम पती आनंद आहुजासोबत उपस्थित होती, पण आनंद आता परत लंडनला गेला आहे आणि सोनमला त्याची खूप आठवण येत आहे. (Sonam Kapoor is doing Miss Husband, posted photo)

पतीच्या आठवणीत फोटो केला पोस्ट
सोनमला तिच्या पतीची आठवण येत आहे. याच आठवणीत तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये आनंदने सेमी-फॉर्मल आऊटफिट घातला आहे, तर सोनमने ब्लश गुलाबी ड्रेस परिधान केला आहे. सोनम आणि आनंद यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करत सोनमने कॅप्शन लिहिले की, “मी तुला खूप मिस करत आहे, तुला भेटण्याची वाट पाहत आहे.” आनंदनेही पत्नीच्या या पोस्टला उत्तर देत लिहिले की, “क्यूट, तू आग लावत आहेस आणि मी असा दिसत आहे की, जसं काय माहित काय करत आहे.”

२०१८ मध्ये झाले लग्न
सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यात तिचा पती लॅपटॉपवर दिसत आहे. सोनम कपूर कॅमेरा तिच्याकडे वळवते आणि ‘नाते’ असे म्हणते. सोनम कपूरने तिचा प्रियकर आनंद आहुजासोबत २०१८ मध्ये लग्न केले होते. दोघेही बऱ्याच वर्षांपासून नात्यात होते.

नुकतेच झाले बहिणीचे लग्न
सोनम कपूरची बहीण आणि निर्माती रिया कपूरचे लग्न १४ ऑगस्ट रोजी झाले. बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत रियाने संसार थाटला आहे. या लग्नात फार कमी पाहुणे उपस्थित होते. रियाच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त, फक्त काही जवळचे मित्र उपस्थित होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा