हिंदी सिनेसृष्टीतील ‘फॅशन दिवा’ म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर, नेहमीच या ना त्या कारणांनी प्रकाशझोतात राहते. इंडस्ट्रीमधील ही फॅशनिस्टा सोशल मीडियावरील सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम सोशल मीडिया आणि तिच्या मुलाखतीमधून फॅन्ससोबत तिचे आयुष्य नेहमीच शेअर करताना दिसते. ८ मे २०१८ साली सोनमने प्रसिद्ध उद्योगपती असणाऱ्या आनंद आहुजासोबत लग्न केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनम नेहमी आनंदसोबतचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करताना दिसते.
सध्या सोनम कपूर तिच्या नवऱ्यासोबत लंडनमध्ये आहे. ती बराच काळ आता लंडनमध्येच असते. सोनमने तिच्या लंडनमधील लाइफस्टाइलचा नुकताच खुलासा केला आहे. एका मोठ्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या सिनेप्रवासासोबतच, वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलासपणे अनेक प्रश्नांना उत्तर दिली.
या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “मला लंडनमधील स्वातंत्र्य खूप प्रिय आहे. इथे मी माझे जेवण स्वतःच बनवते. मी स्वतःच इथली सर्व स्वछता करते. घरात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी देखील मीच करायला जाते.” सोनम म्हणाली, “हे आमच्या जीवनातील पहिले असे वर्ष आहे, जेव्हा आम्ही प्रत्येक रात्र सोबत घालवली आहे. टीव्हीवर काय बघायचे यामध्ये देखील आमचे दुमत असते. आनंदला बास्केटबॉल पाहायला आवडतो तर मला ‘ द क्वीन्स गँबिट’ पाहायचे असते.” याशिवाय तिने आनंदबद्दल अनेक सिक्रेट सांगितले, त्याच्याबाबद्दल भरपूर माहिती दिली.
सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिचा २०१९ साली आलेला ‘झोया फॅक्टर’ हा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. आगामी काळात सोनम ‘ब्लाइंड’ या सिनेमात झळकणार असून, हा चित्रपट एका दक्षिण कोरियाच्या चित्रपटाचा रिमेक आहे. या सिनेमात सुजॉय घोष यांनी सह निर्माता म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय नेटफ्लिक्सवरच्या ‘एके वर्सेस एके’ मध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. ज्यात अनिल कपूर आणि अनुराग बसू यांच्या मुख्य भूमिका होत्या.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










