Saturday, July 27, 2024

एकेकाळी दिग्दर्शक रोहित शेट्टीने लोकल ट्रेनमध्ये खाल्ला आहे महिलांकडून चप्पलीने मार, स्वतःच केला खुलासा

नुकताच प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ (Suryavanshi) चित्रपट धमाल करत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिस ओपनिंग चांगलीच झाली होती. आत्तापर्यंत या चित्रपटाने २६६ कोटींचा आकडाही पार केला आहे. सध्या रोहित शेट्टी देखील त्याच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि त्याचा प्रत्येक चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करतो. रोहित आज चांगल्या पदावर पोहोचला आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. लोकल ट्रेनमध्ये चप्पलेने मार देखील खावा लागला होता.

रोहित शेट्टीचा लोकल ट्रेनने प्रवास

एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक रोहित त्याच्या स्ट्रगल डेजवर बोलताना दिसला. मुलाखतीत जेव्हा रोहितला विचारण्यात आले की, तुम्ही लोकल ट्रेनमध्ये शेवटचा प्रवास कधी केला होता. याला उत्तर देताना तो म्हणतो की, “लोकल ट्रेनमध्ये मी खूप लांबचा प्रवास केला आहे. लहानपणापासून माझा आणि लोकल ट्रेनचा संबंध आहे.” संभाषणादरम्यान रोहितने लोकल ट्रेनचा एक मजेदार क्षणही शेअर केला.

रोहित सांगतो की, लहानपणी तो शाळेत जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करायचा. त्यावेळी पुरुषांच्या डब्यात खूप गर्दी असायची. त्यामुळे त्याला टाळण्यासाठी तो पटकन लेडीज कोचमध्ये चढायचा. त्यावेळी तो लहान होता आणि त्याला शाळेच्या गणवेशात पाहून कुणी काही बोलायचे नाही. रोहितलाही त्याची हळूहळू सवय झाली. त्याची उंची केव्हा वाढली आणि तो मोठा दिसू लागला हे त्याला कळलेच नाही. पण एके दिवशी तो ट्रेनमध्ये चढला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी त्याला पाहून आरडाओरडा केला. एवढेच नाही, तर सर्व महिला त्याला चप्पलने मारहाण करण्याच्या तयारीत होत्या. त्याला पाहून स्त्रिया म्हणत होत्या की, “मारा… मारा…हा इथे कसा आला.”

लोकल ट्रेनचा अविस्मरणीय प्रवास

लोकल ट्रेनबद्दल बोलताना रोहित सांगतो की, “त्या दिवशी मी लोकल ट्रेनमधल्या सगळ्या आंटींना सांगत राहिलो की, मी एक लहान मुलगा आहे. पण ते मान्य करायला कोणी तयार नव्हते.” या घटनेनंतर रोहित इतका घाबरला की, त्याने पुन्हा महिला कोचमध्ये कधीही चढणार नाही अशी शपथ घेतली. रोहित सांगतो की, “त्या दिवसापासून मी ट्रेन सोडायला तयार होतो, पण कधीच लेडीज कोचमध्ये चढलो नाही.”

रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांमधील ऍक्शन सीन आणि महागड्या वाहनांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची ही जबरदस्त डायरेक्शन अनेकांना आवडली आहे. म्हणूनच रोहित शेट्टीला बॉलिवूडचा आईनस्टाईन देखील म्हटले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा