Sunday, December 8, 2024
Home साऊथ सिनेमा धक्कादायक! 24 वर्षीय अभिनेत्याचा भीषण अपघात, ऐन तारूण्यात गमावला पाय

धक्कादायक! 24 वर्षीय अभिनेत्याचा भीषण अपघात, ऐन तारूण्यात गमावला पाय

अभिनेता सूरज कुमार उर्फ ​​ध्रुवन रविवारी (25 जुन)ला म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. या अपघातात अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला म्हैसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूरज कुमार हे डॉ. राजकुमार यांच्या पत्नी श्रीमती पर्वतम्मा यांचे पुतणे आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या अपघातात सूरजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे डाॅक्टरांना  अभिनेत्याचा पाय कापावा लागला.

रविवारी 25 जूनच्या संध्याकाळी 24 वर्षीय अभिनेता सूरज कुमार (suraj kumar) म्हैसूरहून उटीला बाईकवर जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून त्याचा तोल गेला. अशात गुंडलुपेट तालुक्यातील हिरीकाठी गेटजवळ दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्याला एका टिप्पर लॉरीने धडक दिली, ज्यानंतर अभिनेत्याला म्हैसूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अभिनेता सूरज कुमार याने सिनेसृष्टीत आपले नाव बदलून ध्रुवन ठेवले. ताे श्रीमती पर्वतम्मा राजकुमार यांचा धाकटे भाऊ आणि एस.ए. श्रीनिवास यांचा मुलगा आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सूरजच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2019 मध्ये झाली, जेव्हा त्याने दिग्दर्शक रघु कोवीच्या चित्रपटातून पदार्पण केले, या चित्रपटातील ध्रुवचा अभिनय पाहून प्रेक्षकांनी अभिनेत्याची चांगलीच प्रशंसा केला. मात्र, हा चित्रपट काही विशेष चालला नाही. अशात ध्रुवनने दुसरा चित्रपट केला, परंतु तो त्याच्या करिअरसाठी फारसा प्रभावी ठरू शकला नाही.(south actor suraj kumar injured in major road accident he lost his right leg)

अधिक वाचा- 
बिग बॉसच्या घरातून ‘ही’ स्पर्धक पडली बाहेर? एलिमिनेशननंतर अभिनेत्री झाली भावूक
जुळ्या मुलांची नाव ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार शाहरूखची फॅन; अभिनेता म्हणाला,’ प्लिज त्यांना आणखी..’ 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा