Tuesday, September 26, 2023

दलित समुदायाविषयी ‘ते’ विधान करून अभिनेत्याने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड! कडाडून विरोध होताच मागितली माफी

कलाकार कुठल्याही इंडस्ट्रीचा असो, ते अनेक गोष्टीमुळे चर्चेत येत असतात. कधी सिनेमांमुळे, तर कधी रिलेशनशिपमुळे. मात्र, कधीकधी वादग्रस्त वक्तव्यामुळेही त्यांची चर्चा रंगते आणि अडचणीही वाढतात. असेच काहीसे कन्नड अभिनेता उपेंद्र याच्यासोबत घडले आहे. कन्नड इंडस्ट्रीतील या 54 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याने अलीकडेच फेसबुक लाईव्ह सेशनचे आयोजन केले होते. यामध्ये त्याने दलित समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे आता तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दलित समुदायावर वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागलाच, पण त्यासोबतच त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

एफआयआर दाखल
कन्नड अभिनेता उपेंद्र (Kannada Actor Upendra) फेसबुक लाईव्ह येऊन आपला राजकीय पक्ष प्रजाकीयाबाबत बोलत होता. यादरम्यान त्याने दलित समुदायावर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले. कथितरीत्या उपेंद्र याच्याविरुद्ध चेन्नम्मना केरे अचुकट्टू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्ह सेशनदरम्यान अभिनेत्याने अशा शब्दांचा वापर केला, जे एका विशिष्ट समुदायाबाबत आक्षेपार्ह होते. आपल्या पक्षाबाबत बोलताना तो असे म्हणताना दिसला की, “जर कोणते शहर आहे, तर त्यात अपरिहार्यपणे दलित असतील.”

विरोधानंतर हटवला व्हिडिओ
उपेंद्र राव (Upendra Rao) याच्या या विधानानंतर चोहो बाजूंनी त्याच्याविरुद्ध विरोध केला जाऊ लागला होता. अशात वाढता विरोध पाहता अभिनेत्याने व्हिडिओ हटवला आहे. तसेच, म्हटले की, “परिवर्तन फक्त निर्दोष मनातूनच होऊ शकतो. माझी इच्छा आहे की, निर्दोष मन बोलण्यासाठी आमच्यासोबत जोडले जावा. त्याचे सल्ले फायदेशीर असतील. कारण, तो निष्काळजीपणाने बोलणार नाही किंवा कुणाचाही अपमान करणार नाही.”

उपेंद्रच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकच्या रामनगरमध्ये एका दलित समर्थक संघटनेने आंदोलन केले. संघटनेच्या सदस्यांनी उपेंद्रच्या वक्तव्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून त्याचे पोस्टरही जाळले.

एफआयआर दाखल झाल्यानंतर मागितली माफी
जळणारे पोस्टर, वाढत असलेले विरोधी आंदोलन आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर स्थितीची गंभीरता लक्षात घेत उपेंद्रने आपल्या सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्याविषयी भाष्य केले. त्याने यावेळी आपल्या शब्दासाठी माफीही मागितली. त्याने म्हटले की, त्याने चुकून तसे वक्तव्य केले होते. त्याचा परिणाम लक्षात येताच त्याने लगेच तो व्हिडिओ डिलीट केला. त्याने भावना दुखावल्याचे मान्य करत त्याच्या वक्तव्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी म्हटले की, “मी माझ्या वक्तव्यासाठी माफी मागतो.”

उपेंद्रचे सिनेमे
उपेंद्र याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो अनेक हिट सिनेमात दिसला आहे. त्यात ‘सन ऑफ सत्यमूर्ती’, ‘ओम’, ‘घनी’, ‘बुद्धिवंत’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. तो अखेरचा 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘कब्जा’ या सिनेमात दिसला होता. (south actor upendra indulged in controversy making offensive remark against dalits read)

महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना! तब्बल 4 वर्षांनंतर पाहायला मिळाला शाहरुखचा रोमँटिक अंदाज, ‘या’ गाण्यात नयनतारासोबत केला रोमान्स
ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तिरंगा फडकवत शबाना आझमींनी साजरा केला स्वातंत्र्यदिन, म्हणाल्या, ‘अभिमान…’

हे देखील वाचा