Wednesday, June 26, 2024

हीच ती नैसर्गिक सुंदरता! रश्मिकाने विमानतळावर बिनधास्तपणे काढला मास्क; पाहायला मिळाला नो मेकअप लूक

सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. त्या नेहमीच कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात मेकअपमध्ये असतात. मात्र, जेव्हा त्यांच्या मेकअप नसलेला लूक कॅमेऱ्यात कैद होतो, तेव्हा त्यांना ओळखणे देखील कठीण होऊन बसते. मात्र, आता साऊथपाठोपाठ बॉलिवूडमध्येही अभिनयाचा डंका वाजवणारी रश्मिका मंदाना नो मेकअप लूकमध्ये दिसली. रश्मिकाचा लूक पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावतील. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रश्मिकाच्या साधेपणाने लुटली वाहवा
अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही नुकतीच एका विमानतळावर स्पॉट झाली. नेहमीप्रमाणे रश्मिकाच्या साधेपणाने फक्त पॅपराजींचेच नाही, तर चाहत्यांचेही मन जिंकले. विमानतळावर रश्मिका मंदाना नो मेअकप लूकमध्ये (Rashmika Mandanna No Makeup Look) दिसली. यादरम्यान जेव्हा फोटोग्राफर्सनी रश्मिकाला तिचा मास्क काढण्यासाठी पोझ देण्यास सांगितले, तेव्हा संकोच न करता रश्मिकाने पूर्ण आत्मविश्वासाने साधेपणाच्या अंदाजात पोझ देताना दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

असा होता ‘श्रीवल्ली’चा लूक
या व्हिडिओत ‘पुष्पा‘ फेम ‘श्रीवल्ली‘ म्हणजेच रश्मिकाच्या लूकबद्दल बोलायचं झालं, तर ती पांढऱ्या रंगाच्या टी- शर्टसोबत लेगिंगमध्ये दिसली. तसेच, तिच्या हातात फोन आणि मास्कही दिसला. अभिनेत्रीच्या खांद्यावर बॅगही दिसली. तिने केस मोकळे सोडले होते. तसेच, पायात स्लीपर्स परिधान केली होती. विमानतळावरील रश्मिकाचा साधा लूक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले. मेकअपशिवायदेखील रश्मिका खूपच सुंदर दिसत होती.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहते तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “तुझ्यासारखा गोंडसपणा इतर कुठल्याच अभिनेत्रीमध्ये नाहीये.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू मेकअपशिवाय खूपच सुंदर दिसत आहेस.” आणखी एकाने लिहिले की, “तुझ्या या साधेपणावर मी फिदा झालो आहे.”

अभिनेत्रीच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘गुडबाय’ या हिंदी सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका होती. तिच्या खात्यात ‘मिशन मजनू’, ‘पुष्पा- 2’, ‘वरिसू’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (south actress rashmika mandanna spotted at airport without no makeup fans surprise with srivalli look see video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर का दिली आईने फरहान अख्तरला घराबाहेर काढण्याची धमकी? वाचा मनोरंजक किस्सा
जरा दमानं! ऐश्वर्याने भर कार्यक्रमात सर्वांपुढे अभिषेकसोबत केले होते फ्लर्ट; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद

हे देखील वाचा