×

‘या’मुळे संजय दत्तला मागावी लागली होती माधुरी दीक्षितची माफी, ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

संजय दत्त (Sanjay Dutt) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हे हिंदी चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता. त्याचप्रमाणे अभिनेता संजय दत्तनेही याच काळात आपल्या अभिनयाच्या जादूने प्रत्येकाला वेड लावले होते. मात्र याच काळात संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या प्रेमप्रकरणाचीही चर्चा समोर आली होती. काय होती त्यांच्या या प्रेमाची खरी कथा चला जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे बॉलिवूड चित्रपटातील सर्वात आवडते कलाकार म्हणून ओळखले जातात. ‘साजन’ आणि ‘खलनायक’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशानंतर या दोघांच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या दोघांनीही याबाबत कधीच प्रतिक्रिया दिली नाही. १९९३ मध्ये एका फिल्म मॅगझिनशी बोलताना संजय दत्तने यावर प्रतिक्रिया दिली होती. अफेअरच्या बातम्यांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तर देताना संजय दत्तने ‘आमच्यात कोणतेही प्रेमप्रकरण नाही’ असा खुलासा केला होता.

एका मुलाखतीदरम्यान संजय दत्तने सांगितले होते की, “या बातम्यांमुळे प्रेक्षक आणि चाहत्यांची नजर माधुरीवर होती. या सगळ्यासाठी ती कुठेही जबाबदार नसली, तरी याबद्दल तिला कधीकधी अस्वस्थ वाटायचे.” इतकेच नव्हे, तर या सर्व प्रकाराबद्दल संजय दत्तने माधुरीकडे जाऊन माफीही मागितली होती. माधुरीनेही त्याला मोठ्या मनाने माफ केल्याचे सांगितले होते. या प्रेमप्रकरणाची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

दरम्यान, नुकताच संजय दत्तचा ‘KGF 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तो साऊथचा सुपरस्टार यशसोबत (Yash) दिसत आहे. याशिवाय ‘शमशेरा’मध्येही तो महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ज्यामधील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची ही जोडी २०१९ मध्ये मल्टिस्टारर ड्रामा फिल्म ‘कलंक’मधून बऱ्याच काळानंतर पुन्हा पडद्यावर दिसली. तरीही हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. तर माधुरीनेही ‘द फेम गेम’मधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post