Friday, May 24, 2024

धक्कादायक! ‘कांगुवा’च्या सेटवर सूर्याचा अपघात, अभिनेता गंभीर जखमी

साऊथचा प्रसिद्ध सुपरस्टार सूर्याबाबत मोठी बातमी येत आहे. सूर्याचा मोठा अपघात झाला आहे. शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर फिल्म युनिटला तात्काळ अलर्ट करण्यात आले. सध्या त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूर्या त्याच्या आगामी ‘कांगुवा’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

तामिळ अभिनेता सूर्या गंभीर जखमी झाला आहे. चेन्नईमध्ये कांगुवा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अपघात घडला. शूटिंगदरम्यान एक सीन चित्रित करत असताना कॅमेरा सूर्यावर पडला. त्यामुळे त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, तो सध्या रुग्णालयात दाखल आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची बातमी मिळालेली नाही. कंगुवा’च्या शूटिंगदरम्यान एका रोप कॅमेऱ्याचे नियंत्रण सुटले आणि तो सुर्यावर पडला. यामुळे त्याला दुखापत झाली आहे.

सूर्याची तमिळसोबतच तेलुगू जगतातही चांगली क्रेझ आहे. त्याच्या चित्रपटांना टॉलिवूडमध्ये चांगली बाजारपेठ आहे. त्यामुळे सूर्याचा प्रत्येक चित्रपट तेलुगुमध्ये डब केला जातो. सध्या तो कांगुवा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अॅक्शन डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध असलेला शिवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)

 या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, एका ऐतिहासिक कथेवर आधारित या चित्रपटात बॉलिवूड ब्युटी दिशा पटानी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. तसेच हा चित्रपट एकाच वेळी 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अॅक्शन सीन्स हे या चित्रपटातील मुख्य आकर्षण असेल. या चित्रपटाचे रिलीज झालेले पोस्टर्स आणि झलक याआधीच चाहत्यांना खूप प्रभावित करत आहेत. कांगुवा चित्रपट 3डी आणि आयमॅक्स तंत्रज्ञानामध्ये 38 भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता सूर्याच्या दुखापतीमुळे शूटिंगला विलंब होण्याची शक्यता आहे. (south famous actor suriya got injured while shooting on set of upcoming movie kanguva)

आधिक वाचा-
अभिनेत्री सोनाली पाटीलने तृतीयपंथींना भेटल्यानंतरचा अनुभव केला शेअर, म्हणाली, “थर्ड जेंडर…”
चार मुलं असताना सलीम खान यांनी केले होते हेलनसोबत लग्न, अशी होती कुटुंबीयांची प्रतिक्रिया

हे देखील वाचा