Tuesday, May 21, 2024

अभिनेत्री सोनाली पाटीलने तृतीयपंथींना भेटल्यानंतरचा अनुभव केला शेअर, म्हणाली, “थर्ड जेंडर…”

स्त्री असो वा पुरुष, प्रत्येक माणसाच्या जीवनात संकटं असतातच. पण जेव्हा ती व्यक्ती तृतीयपंथी असते, तेव्हा या अडचणी अधिकच वाढतात. म्हणजेच, आपल्या समाजात तृतीयपंथीयांकडे तुच्छतेनं पाहिलं जातं. त्यांच्याकडे फारस कोणी लक्ष देत नाही. अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मीडियावर आपल्या बोल्ड आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच तिने तृतीयपंथींच्या भेटीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोनाली पाटीलने (Sonali Patil) पोस्ट करताना लिहिले की, “श्रीकृष्णा तू अद्भुत कलाकृतींचा जनक आहेस हे मला आणि जगातील बुद्धिमान सजीवांना माहित आहे …….तू एक ना अनेक अद्भुत कलाकृती निर्माण केल्या आहेस त्यामधे स्त्री,पुरुष आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसरी व्यक्ती म्हंजे तृतीयपंथी ही तूच तयार केले आहेस …..पहिल्यापासूनच का कुणास ठाऊक या व्यक्तींचा मला आकर्षण आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असं मनामध्ये कुतूहल नेहमी असायचं आणि असतं जेव्हा केव्हा त्या समोर येतात जशा त्यासमोर येतात तसं मी त्यांच्याकडे बघत राहते. कारण तुझी कलाकृती तितकी सुंदर आहे अद्भुत आहे.

कदाचित त्यामुळे असेल …आपल्या लेखी भाषेमध्ये त्यांना तृतीयपंथी थर्ड जेंडर म्हणतात. त्यांच्यापासून मी कधीच पळाले नाही, घाबरले नाही. कदाचित म्हणूनच त्यांना पाहिल्यावर आणि त्यांनी मला पाहिल्यावर आम्ही बोललो भेटलो आणि vlog mdhe capture ही केलं. ते आपला स्वीकार करतात ना मग चला तर आपण पण त्यांचे होऊ. बिग बॉस वाल्यांनो मला मला पुन्हा बिग बॉसच्या घरात घ्या अशी मागणी आलेली आहे तेव्हा प्लीज मला लवकर बोलवा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)

 सोनालीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “ह्याच्याकडून आशिर्वाद भेटन हा नशिबाचा भाग आहे. तू खूप नशीबवान आहे. त्यांनी बोलेल्या गोष्टी खऱ्या होतात. सोना लवकरच बिग बाॅसमध्ये दिसणार आता. पण आता आम्हाला सोनाली हिला हिंदीत काम करताना बघायला खूप आवडेल ” दुसऱ्याने लिहिले की, “खरच सोनाली मॅम दहा रुपए जरी आपण त्यांना दिले. तरी ते समाधानी असतात आणि आनंदाने आशिर्वाद देतात. मी त्यांच्या कडुन नेहमी आशिर्वाद घेते, त्यांच्या लाइफमध्ये खरच खुप स्ट्रगल आहे. पण ते नेहमी त्यांचा चेहर हसरा आसतो. जे तुमच्या पाठीमागे उभे आहेत.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Actress Sonali Patil shares her experience after meeting third parties)

आधिक वाचा-
काय सांगता!! सलीम खान त्यांच्या मोकळ्या वेळात अर्धा-अर्धा तास बोलायचे राँग नंबरवर, पाच मुलांमुळे वाढले होते खूपच काम
मौनी रॉयच्या लांबलचक वेणीने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहा फोटो

हे देखील वाचा